आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती धावायला जात नसेल तर तुम्ही त्यांच्यासाेबत पळा, धावपटू क्रांती साळवी यांचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चर्चासत्रात बाेलतांना क्रांती साळवी - Divya Marathi
चर्चासत्रात बाेलतांना क्रांती साळवी
जळगाव - अापला पती धावण्यासाठी टाळाटाळ करीत असेल तर त्यांना टाेमणे मारण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यासाेबत जाऊन धावा व व्यायाम करा. कुटुंब मिळून धावणे एन्जाॅय करा. धावणे ही एक जीवनशैली म्हणून त्याचा अंगीकार करायला हवा, असे प्रतिपादन धावपटू क्रांती साळवी यांनी केले.  
 
जळगाव रनर्स ग्रुप व राेटरी क्लब अाॅफ वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवारी राेटरी भवन, मायादेवीनगर येथे ‘दाैडाे जिंदगी के लिए’ या विषयावर व्याख्यानाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. याप्रसंगी साळवी बाेलत हाेत्या. अापल्या मुलास खेळताना पाहून त्यातून प्रेरणा घेऊन क्रांती यांनी वयाच्या ४२व्या वर्षी धावणे सुरू केले होते. अमेरिकेतील  प्रतिष्ठेच्या  ‘बाेस्टन मॅरेथाॅन’मध्येही त्यांनी सहभाग नाेंदविला अाहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रायसाेनी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती अग्रवाल, जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील, डाॅ.कीर्ती देशमुख, डाॅ. वृषाली पाटील, राेटरी क्लब अाॅफ वेस्टचे अध्यक्ष अॅड. सूरज जहांगीर, सचिव कुमार वाणी मंचावर उपस्थित हाेते. 

या वेळी डाॅ. रवी हिराणी यांनी जळगाव रनर्स ग्रुपची माहिती दिली, तर किरण बच्छाव यांनी क्रांती साळवी यांचा परिचय करून दिला. 

धावण्याच्या टिप्स ऊर्जा, क्षमता वाढते  : गृहिणी म्हणून अापण प्रत्येक जबाबदारी पाळतच असताे. अनेकदा यामुळे स्वत:कडे लक्ष दिले जात नाही अाणि दिल्यास अापल्यालाच ते स्वार्थीपणाचे वाटते; पण हा स्वार्थीपणा अंगी बाळगा. स्वत:साठी व कुटंुबासाठी धावण्याने मला वेळेच्या नियाेजनासह अात्मविश्वास दिला. माझ्यातील ऊर्जा व क्षमता वाढली. एक दिवस जर अापण व्यायाम केला नाही तर अापल्याला असे वाटायला हवे की, माझे काही तरी चुकले. व्यायामाचा भाग तुमच्या दिनचर्येत असणे गरजेचे अाहे. मुलासाठी सुरू केलेले धावणे माझ्यासाठी हाेऊन बसले. मोठा मित्र परिवार दिला, नाव दिले अाणि अाज एक अात्मविश्वासाने भरलेली महिला म्हणून इथे उभी अाहे, असेही साळवी यांनी सांगितले.
 
महिलांनीही व्यायामाकडे लक्ष द्यावे
धावण्याच्या सगळ्या प्रक्रियेत मला माझ्या कुटंुबाची खूप माेठी साथ मिळाली.  आपले स्वप्न आपणच पूर्ण करायला हवे. अाता उशीर झाला, असा विचार  मनातून काढून टाका. अायुष्यात पुढे जायचे असेल तर काेणतीही वेळ याेग्य ठरू शकते. यात कुटुंबीयांकडून मिळणारा अाधार, पाठिंबाही तितकाच महत्त्वाचा असताे. महिलांनीही व्यायामाकडे लक्ष द्यावे, असे अावाहन क्रांती साळवी यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...