आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिनचा खून मध्यरात्री झाल्याचा पोलिसांचा कयास, धागेदाेरे शोधण्यात पोलिसही ठरताहेत अपयशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरातील गणपती मंदिराजवळ असलेल्या पुलाजवळ मिशन कंपाउंडमध्ये राहणाऱ्या सचिन रमेश सावळे (जाेशी) याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात अाल्याचा प्रकार उघडकीस अाला हाेता. त्याचा खून गुरुवारी मध्यरात्री ते वाजेच्या सुमारास झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात अाहे.

गणपती पुलाच्या कमानीखाली सचिन सावळे (जाेशी) या इसमाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी अाढळून अाला हाेता. त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात अाल्याने संपूर्ण अंग रक्ताने माखलेले हाेते. तसेच त्याच्या मृतदेहाजवळ मुली वापरत असलेला नवीन स्कार्फ अाढळून अाला हाेता. याप्रकरणी सचिनची अाई राेहिणी सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पाेिलस स्टेशनला खुनाचा गुुन्हा दाखल करण्यात अाला. शवविच्छेदन अहवालातूनही त्याने मृत्यूपूर्वी शरीरसंबंध केल्याचे िकंवा मद्यप्राशन केल्याचेही निष्पन्न झालेले नाही. तसेच पैशांसाठी त्याचा खून हाेण्याचीही शक्यता नसल्याने नेमका खून काेणत्या कारणासाठी अाणि काेणी केला असावा? याबाबत पाेलिसांकडून सर्व शक्यता पडताळून पाहण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी हिमंत जाधव यांच्याकडून देण्यात अाली. याबाबत सचिनच्या माेबाइलचा डाटाही तपासण्यात अाला. त्यात त्याने गुरुवारी दुपारी संंबंधित महिला अाणि अापल्या अाईशी संभाषण केले हाेते. प्रत्येक वेळी तीन ते चार मिनिटे ताे बाेललेला अाहे. िदवसभरात अनेक काॅल त्याच्या माेबाइलवरून केले गेलेले अाहेत. रात्री १०.३८ वाजेनंतरच मात्र काॅल झालेले नसल्याचे अाढळून अाल्याचे समजते.

रुमाल, स्कार्फ खरेदी
मयत सचिनच्या पँटच्या खिशातून नवीन हातरुमाल अाणि मृतदेहाजवळ महिलांकडून वापरण्यात येणारा स्कार्फ अाढळला हाेता. ताेदेखील नवीन हाेता. त्यामुळे नवीन रुमाल स्कार्फ नेमका कशासाठी खरेदी केला हाेता? स्कार्फ काेणाला देण्यासाठी की अन्य कशासाठी घेतला हाेता? यामागील गाैडबंगाल नेमके काय अाहे? यादृष्टीनेही पाेलिसांकडून तपास केला जात अाहे. मात्र, अद्याप धागेदोरे हाती लागलेले नाहीत.

महिलांची चौकशी
प्रारंभी सचिनचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचा संशय व्यक्त हाेत हाेता. त्यादृष्टीने पाेलिसांकडून सचिनची अाेळख असलेल्या दाेन महिलांना पाेलिस ठाण्यात अाणून त्यांची चाैकशी करण्यात अाली. मात्र, त्यातून फारसे काही हाती लागले नाही. तसेच िदवसभरात सचिनचा ज्यांच्याशी संबंध अाला, त्यांना पाेलिस स्टेशनला बाेलावून त्यांची चाैकशी करण्यात अाली. मात्र, संबंधितांच्या चाैकशीतून खुनाचे नेमके कारण अथवा त्याबाबतचे काेणतेही धागेदाेरे हाती लागलेले नाहीत.
बातम्या आणखी आहेत...