आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साकरीत महिलेची आत्महत्या; शवविच्छेदनास तास विलंब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरणगाव - साकरी (ता.भुसावळ) येथील ज्योती सुरेश नेमाडे (वय ४७, मूळ रा.कोथळी) या महिलेने सोमवारी खडका शिवारातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. यानंतर नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला. मात्र, कोट्वधींचा खर्च करूनही पांढरा हत्ती ठरलेल्या या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीच नसल्याने शवविच्छेदनासाठी सुमारे तास प्रतीक्षा करावी लागली. 
 
ज्योती नेमाडे यांनी खडका शिवारातील रामभाऊ पाचपांडे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिस आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवला. मात्र, वैद्यकीय अधिकारीच नसल्याने शवविच्छेदनास विलंब लागला. सुमारे पाच तासांनी आलेल्या डॉक्टरांनी शवविच्छेदन केले. दरम्यान, कोट्यवधी रुपये खर्च होवूनही वरणगाव रुग्णालयाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम अपूर्ण आहे. मशिनरी धूळ खात पडल्या असून रुग्णांवर चक्क पोर्चमध्ये उपचार करावे लागतात. याविषयी एकाही लोकप्रतिनिधीला सोयरेसूतक नाही. हे कमी म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मंजूर चारपैकी केवळ दोन जागा भरलेल्या आहेत. त्यापैकी एक महिला वैद्यकीय अधिकारी सहा महिन्यांपासून सुटीवर, तर दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल चांदा २० डिसेंबरपासून एक महिन्याच्या रजेवर आहेत. यादरम्यान जिल्हा प्रशासनाने डॉ.देवर्षि घोषाल यांची प्रभारी नेमणूक केलेली असली तरी डॉ.घोषाल यांच्याकडे आधीच तीन ठिकाणचा पदभार आहे. 

घटनेची माहिती मिळताच आमदार सावकारे वरणगावी दाखल झाले. 

‘जिल्हा शल्यचिकित्सकां’वर कारवाई करा 
वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यसेवा अतिशय संवेदनशील विषय बनला आहे. आधीच रिक्त पदे आणि आहे ते डॉक्टर सुटीवर गेल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांनी इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती करणे गरजेचे होते. मात्र, नेहमीप्रमाणे सुरू असलेली चालढकल नाराजीचे कारण ठरत आहे. या शल्यचिकित्सकांवर कारवाई करावी, अशी मागणी पालिकेतील भाजपचे गट नेते सुनील काळे यांनी आरोग्य उपसंचालक (नाशिक) यांच्याकडे केली आहे. नगरसेवक सुनील काळे, सुधाकर जावळे, तळवेल येथील ज्ञानेदेव झोपे आदी उपस्थित होते. 

आमदार रुग्णालयात 
वरणगाव ग्रामीण रुग्णालय वाऱ्यावर असल्याने पंचक्रोशीत तीव्र नाराजी आहे. याची यापूर्वी एकाही पुढाऱ्याने दखल घेतली नाही. सोमवारी मात्र साकरी येथील ज्योती नेमाडे (मूळ रा. कोथळी, ता. मुक्ताईनगर) यांनी आत्महत्या केल्याने मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणला गेला. येथे शवविच्छेदनासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने संतप्त नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली. ही माहिती मिळताच आमदार संजय सावकारे यांच्यासह भाजपची बडी मंडळी रुग्णालयात दाखल झाली. त्यांनी आरोग्य उपसंचालकांशी बोलणी केली. यानंतर डॉ. घोषाल यांनी रुग्णालय गाठून मृत महिलेचे शवविच्छेदन केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...