आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा बळकावण्यावरून वाद; पेट्राेलच्या बाटलीसह मोर्चा, प्रशासनाचा संयम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्री येथे ठिय्या देऊन बसलेले मोेर्चेकरी. - Divya Marathi
साक्री येथे ठिय्या देऊन बसलेले मोेर्चेकरी.
साक्री - नगरपंचायतीच्या हद्दीतील वापर करण्यासाठी दिलेली खासगी अतिक्रमित जागा बळकावण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. यात गंभीर जखमी झालेल्या रंगनाथ भवरे यांनी संबंधितांना अटक करावी आपली जागा परत करावी, या मागणीसाठी तहसील नगरपंचायत कार्यालयावर माेर्चा अाणला. त्या वेळी माेर्चेकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. मात्र, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील पेट्रोलची बाटली काढून घेतली. विशेष म्हणजे पायाला मारहाणीत झालेले फ्रॅक्चर असल्याने पाटा बांधलेल्या अवस्थेत जखमी रंगनाथ भवरे यांनी रिक्षात बसत मोर्चात सहभाग घेतला. 
 
भिल्ल समाजातील सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ भवरे यांनी आठवडे बाजार गढी भिलाटी परिसरात काही वर्षांपूर्वी तत्कालीन ग्रामपंचायतींतर्गत गावठाण जागेवर अतिक्रमण केले होते. ती जागा विश्रामअप्पा पगारे या टेलरिंग काम करणाऱ्या एकाला वापरायला दिली. वास्तू झाल्यावर परत करण्याच्या अटीवर दिली. या जागेवर भिल्लांचे दैवत एकलव्याचा पुतळा उभारण्यात येणार आहे, असा दावा भवरे यांनी केला आहे. विश्राम पगारे याचे घर बांधून झाल्यावर जागा परत करण्याची मागणी रंगनाथ भवरे यांनी केली. मात्र, पगारे याने जागा परत करण्याची मागणी धुडकावून लावली. त्यामुळे त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. रंगनाथ भवरे यांना विश्राम अप्पा पगारे, राहुल विश्राम पगारे, बापू अप्पा पगारे, संतोष अप्पा पगारे, जितू बापू पगारे, राजेंद्र पवार (सर्व रा.गढी भिलाटी) यांनी लोखंडी गज पाइपने मारहाण केली. मारहाणीत भवरे यांचा पाय बरगड्या मोडल्या आहेत. अशा आशयाची फिर्याद भवरे यांनी दाखल केली असून, भादवि ३२५, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६, प्रमाणे तपास सहायक उपनिरीक्षक झाल्टे करीत आहेत. विश्राम अप्पा पगारे (४६, रा. कोकले, हल्ली मुक्काम गढी भिलाटी) यानेही पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, गोविंदा दशरथ सोनवणे, गणेश रामू सोनवणे, मनेश रामदास सोनवणे, अरुण रंगा भवरे, दशरथ रंगा भवरे (सर्व रा.गढी भिलाटी) आदींनी मारहाण केली, असा आरोप केला आहे. या प्रकरणात भादंवि १४३ , १४७ ,१४९, ३२४ , ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक अतुल तांबे अधिक तपास करीत आहेत. 
 
दरम्यान, पोलिसांनी दोन्ही पक्षातील काही जणांना अटक केली आहे. फिर्यादीत नावे दिलेल्या सर्वांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी आश्वासन दिले. त्यानंतर मोर्चाने आलेले भवरे यांचे समर्थक परतले. मात्र यामुळे शहरातील अतिक्रमीत जागांचा प्रश्न पुढे आला. तहसीलने याबाबत मोजणी करण्याची भूमिका घेतली तर बऱ्याच जागांचे वाद सुरू होतील, असे चित्र आहे. 
 
प्रशासनाचा संयम... 
तहसीलसहनगर पंचायतीवर मोर्चा आल्यानंतर प्रशासनाने संयमाने मोर्चा हाताळला. मुळात ज्या जागेवरून दोन गटात वाद झाला. त्या जागेचे नेमकी स्थिती काय आहे, हे कागदपत्रांवरून जाणून घेतले जाईल. परंतु मोर्चेकऱ्यांनी हाणामारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रशासनाने संयमाने स्थिती हाताळत कारवाई करण्याची आश्वासन दिल्याने मोर्चेकरी परतले.