आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एक के बदले दस सर लाऊंगा\', म्हणणारे मोदी कुठे गेले, संघर्षयात्रेत अजितदादांची जाधव प्रकरणी टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - संघर्षयात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी करतानाच विरोधकांनी नरेंद्र मोदींनाही टीकेचे लक्ष्य केले आहे. एक सर के बदले दस सर लाऊंना असे म्हणणारे, मोदी आता कुठे गेले, असा सवाल अजित पवारांनी संघर्षयात्रेदरम्यान पारोळ्यात केला. कुलभूषण जाधवला सुनावलेल्या फाशीच्या प्रकरणावरून त्यांनी मोदींवर हल्ला चढवला. 
 
बुलडाण्यातून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात संघर्षयात्रा रविवारी सकाळी जळगावातील पारोळ्यात पोहोचली. बैलगाडीतून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांचे नेते पारोळ्यामध्ये पोहोचले. पारोळ्यातून ही संघर्षयात्रा नंदुरबारला जाणार आहे. यावेळी अजित पवारांसह, जितेंद्र आव्हाड, राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, अबू आझमीं यांच्यासह विविध पक्षाचे नेते बैलगाडीवरून सभांच्या ठिकाणी पोहोचले. 
 
अमळनेरात काय म्हाणाले पवार...
अमळनेर येथील सभेत शेतकऱ्यांशी अजित पवारांनी थेट संवाद साधला. संघर्षयात्रेच्या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांच्या व्यथा जवळून पाहता येत आहे. शेतकऱ्यांच्या मुलीने केलेली आत्महत्या आणि जालन्यातील शेतकरी दाम्पत्यानं केलेली आत्महत्या ही दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांनो...आता पेटून उठायलाच हवे. असे त्यांनी खडे बोल सुनावले.
 
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका यावेळी विरोधकांकडून करण्यात आली. एरंडोल येथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी संघर्षयात्रा ही कोणतीही राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नसल्याचे म्हणाले. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नसल्याने लढत असल्याचे पवार यावेळी म्हणाले. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...