आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे : खंडर जागा, घरांमध्येच भरतात बालकामगारांच्या घोषित शाळा; नियमांना मिळते तिलांजली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालकामगारांची सुरू असलेली शाळा. - Divya Marathi
बालकामगारांची सुरू असलेली शाळा.
धुळे - शहरात बालकामगारांवर खर्ची हाेणारी अनुदानाची रक्कम शाळांमध्ये नसलेल्या बालकामगारांमुळे या शाळा चर्चेत अालेल्या असताना, अाता या शाळांच्या तासांवरून गाेंधळ सुरू अाहे. मुळात या शाळांमध्ये विद्यार्थी नसतात. त्यामुळे इतर शाळांमधील विद्यार्थीच या शाळांमध्ये दाखविले जातात. त्याचबराेबर या शाळा किमान पाच तास सुरू ठेवायला हव्या. मात्र केवळ तीन तासांत त्या रिकाम्या हाेतात. काही ठिकाणी अगदी खंडर इमारतीत तर काही ठिकाणी घरातच बालकामगारांच्या शाळा चालविल्या जातात. या शाळांच्या दर्शनीय भागावर शाळेचे फलक लागतच नाही. यातून नियमांना तिलांजली दिली जात असल्याची बाब ‘दिव्य मराठी’च्या चमूने प्रत्यक्ष दिलेल्या भेटीत दिसून अाली. 
 
शिक्षणाच्या वयात धोकेदायक ठिकाणी काम करणाऱ्या बालकांचे पुनर्वसन करून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणता यावे या उद्देशाने शासनाने राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प २००५पासून सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सद्य:स्थितीत शहरात नऊ शाळा सुरू आहेत. या शाळांना ‘दिव्य मराठी’च्या चमूने काल मंगळवारी प्रत्यक्ष भेट दिली.या वेळी अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बालकामगारांच्या शाळांची वेळ सकाळी ते १२ दुपारी १२ ते अशी निश्चित आहे. या शाळा किमान पाच तास सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात शाळांचे कामकाज हे सकाळी ते १२ दुपारी ते या कालावधीत म्हणजे अवघे तीन तास चालते. अध्यापनासाठी नियुक्त विशेष शिक्षकांचे शिक्षणही यथातथाच आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे हजेरी पुस्तक, कर्मचाऱ्यांची नोंदवही, मस्टर आदी शैक्षणिक सामग्रीही ठेवण्यात आलेली नाही.
 
शाळांना प्रत्यक्ष भेट दिली असताना प्रत्यक्ष पटावर नोंद असलेले बालकामगार आणि हजर विद्यार्थ्यांमध्येही कमालीची तफावत आहे. या शाळांमध्ये फक्त बालकामगारांचेच शिक्षण अपेक्षित आहे. मात्र पट दाखविण्यासाठी चक्क मूळ शाळकरी विद्यार्थ्यांनाच शाळेत बसविण्यात येत आहे. विशेष शाळांच्या बाहेर शाळेचे संस्थेच्या नावाचा फलक लावणे आवश्यक आहे. मात्र संस्थाचालकांनी या मुद्द्याकडे थेट दुर्लक्ष केलेले आहे.शाळांच्या इमारतीही यथातथाच आहे.काही ठिकाणी धोकेदायक इमारतीत शाळा चालतात तर काही ठिकाणी राहत्या घरातच विशेष शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. या सर्व गंभीर प्रकाराचे सोशल ऑडिट झाल्यास गंभीर बाबी समोर येणार आहेत. 
 
परिसरातील लोकांनाच माहिती नाही शाळा 
महापालिका उर्दू शाळेजवळ हुतात्मा शिरीषकुमार ही विशेष शाळेची बालकामगार प्रकल्प कार्यालयाच्या दप्तरी नोंद आहे.मात्र या परिसरात प्रत्यक्ष शोध घेतला असता, शाळेची माहिती परिसरातील लोकांनाही नाही. तसेच या परिसरात कोठेही दर्शनीय भागावर फलक लावण्यात आलेला नाही. 
 
सहा शाळांना नाही पोषण आहार 
प्रकल्प शाळांसंदर्भात असलेल्या शासन आदेशात बालकामगारांना शिक्षण हक्क कायद्यानुसार नियमित शाळेत दाखल करून घेणे बंधनकारक आहे. याच कालावधीत तो विद्यार्थी विशेष शाळेतही यावा. विशेष शाळा तसेच नियमित शाळा अशा दोन्ही ठिकाणी या विद्यार्थ्यास पोषण आहार मिळणे आवश्यक आहे.मात्र जोगाईमाता शैक्षणिक मंडळ आणि इंदिरा महिला बालकल्याण अपंग पुनर्वसन विकास मंडळाच्या सहा शाळांमध्ये पोषण आहारच देण्यात येत नाही. इतर शाळांमध्ये मात्र नियमित पोषण आहार देण्यात येतो.परिणामी या बालकामगारांच्या हिश्श्याचा पोषण आहार जातो कोठे हा संशोधनाचा विषय आहे. 
 
घरातच भरते शाळा 
श्रमसाफल्य कॉलनी, गोंदूर रोड येथे संत कबीर या नावाने बालकामगार शाळा भरते. ही शाळा राहत्या घरातच भरते. पटावर संख्या ३८ तर प्रत्यक्ष हजर विद्यार्थी २२ एवढे हाेते. त्यातही बहुतांश विद्यार्थी नियमित शाळेतील विद्यार्थी आहेत, असेही दिसून आले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, अशी आहे स्थिती आणि वर्षभरात ३९ लाखांचा खर्च... 
बातम्या आणखी आहेत...