आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञानाचे लेखन करताना मांडणी रंजक पद्धतीने हवी, मराठी विज्ञान परिषदेत देशपांडे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी त्यांना समजेल, रुचेल अशा साध्या-सोप्या भाषेत अभ्यासक्रम तयार करायला पाहिजे. तसेच विज्ञानाचे लेखन करताना ते रंजक पद्धतीने मांडण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अ. पां. देशपांडे यांनी केले. 
 
मराठी विज्ञान परिषदेतर्फे नूतन मराठा महाविद्यालयाच्या जगदीशचंद्र बोस सभागृहात रविवारी पहिल्या सत्रात ‘विज्ञानलेखन’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील अ.पां.देशपांडे हे होते. चर्चासत्रास सोलापूर येथील प्रा.राजाभाऊ ढेपे, सांगलीचे प्रा.मोहन मदण्णा, मुंबई येथील डॉ.विवेक पाटकर, प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख उपस्थित होते. 
 
विज्ञानामुळे नवीन शब्द तयार 
अलीकडच्या काळात विज्ञानामुळे अनेक नवीन शब्द तयार होत आहेत. मात्र, या शब्दांना मराठी भाषेत दुसरा शब्द उपलब्ध नाही. विज्ञानलेखनात किंवा मराठी भाषेच्या लेखनात हे शब्द वापरले जात आहेत. या शब्दांचे उदाहरणदेखील या चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांकडून देण्यात आले. तसेच डॉ.विवेक पाटकर यांनी ‘गणितविज्ञान’ या विषयावर मत मांडले.
 
 सत्राच्या अखेरीस प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांनी वनस्पतीशास्त्रावर आपले मत व्यक्त करताना आदिवासी समाज वनस्पतीशास्त्राचे जतन करणारा समाज असून, विज्ञानलेखन करताना त्यांच्यावरदेखील लेखन करण्याची गरज व्यक्त केली. दरम्यान, सकाळसत्रात कांचन पाटील यांनी मार्गदर्शन केले. 
बातम्या आणखी आहेत...