आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विषारी विंचवाने दिला पिलांना जन्म,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- ‘विंचवा चेेबिऱ्हाड पाठीवर’ असे म्हटले जाते. त्याची प्रचिती सर्पमित्र संदीप गायकवाड यांच्याकडे असलेल्या मादी विंचवाने पिलांना जन्म दिल्यावर आली आहे. या मादी विंचवाने पिलांना जन्म दिल्यानंतर पिलांना पाठीवर बसवून फिरत आहे. संदीप गायकवाड यांनी या मादी विंचवाला वाचविल्यानंतर तिने पिलांना जन्म दिला आहे. लाल विंचू म्हणून आेळखल्या जाणाऱ्या या विंचवाचे लॅटिन नाव असे आहे. या विंचवाच्या विषावर उतारा मुंबईच्या हाफकीन इन्स्टिट्यूट येथे उपलब्ध आहे. औषध उपलब्ध नसले तरी योग्य उपचाराने बरा होऊ शकतो. हा विंचू जगातील घातक विंचवांच्या जातीत मोडला जातो. वेळेवर योग्य उपचार केल्यास ७२ तासांत रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. हा विंचू कोकण भागात जास्त आढळतो. मराठीत त्याला लाल इंगळी किंवा लाल विंचू म्हणतात. विंचवाचे प्रमुख खाद्य म्हणजे कीटक होय. विंचवाच्या अवयवावर असलेल्या सूक्ष्म केसांनी आजूबाजूच्या वातावरणातल्या कंपनांच्या मदतीने ते भक्ष्य पकडतात. दिवसा ते सहसा बाहेर पडत नाही. रात्रीच्या वेळी शिकारीला बाहेर पडतात. हे विंचू अन्नपाण्याविना एक वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात. मादी ही नरापेक्षा मोठी असते. विंचवाचे विष हे मज्जासंस्थेवर परिणाम करते. यामध्ये रुग्णाला उलटी, लाळ गळणे, अंग थरथरणे ही काही लक्षणे दिसतात. ज्यामुळे हृदयाला कार्य करण्यात अडचण निर्माण होते, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांनी दिली.

सर्पमित्र संदीप गायकवाड यांच्याकडे असलेला विंचू अशा प्रकारे पिलांना पाठीवर घेऊन फिरतो.
बातम्या आणखी आहेत...