आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तातडीच्या विशेष महासभेतील ठराव मुख्यमंत्र्यांकडे रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सेंट्रल फुले मार्केटमधील सील केलेले गाळे उघडावेत यासाठी राजकीय पातळीवरून प्रचंड दबाव येत असताना महासभेने सील उघडण्याची भूमिका घेतली आहे. तसेच शासनाने तसे आदेश दिल्यास त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा ठरावही केला आहे. याबाबत शासनाचे आदेश येण्यापूर्वीच तातडीने गुरुवारी सकाळी हा ठराव महापौरांच्या पत्रासह रवाना करण्यात आला.
राज्य शासनाकडे व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे नगरविकास विभागाकडून मनपाकडे वेगवेगळ्या मुद्द्यांवर सखाेल अहवाल मागवले जात आहेत. याबाबत १३ जुलै रोजी खुलासा दिलेला असताना पुन्हा नव्याने बारीकसारीक माहिती मागवण्यात येत आहे. शासन कलम ४५० ‘अ’मधील तरतुदीनुसार गाळेधारकांच्या हिताचा निर्णय देण्याची शक्यता असल्याने बुधवारी तातडीची महासभा बोलावण्यात आली होती. त्यात शासनाने असा कोणताही आदेश दिल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्याचा ठराव करण्यात आला. तसेच आयुक्तांनीही न्यायालयाच्या निर्णयाआधी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करू नये, असा ठराव केला आहे. शासनाच्या आदेशापूर्वी मनपा सभागृहाचे मत अर्थात ठराव शासनापर्यंत पाेहाेचणे गरजे असल्याने तो रवाना करण्यात आला.
ठरावाचे भवितव्य काय?
महासभेत खाविआ, मनसे राष्ट्रवादीने बहुमताने ठराव मंजूर केला. परंतु, आयुक्त संजय कापडणीस यांनी गाळ्यांचे सील उघडण्यासंदर्भात शासनाने कोणताही निर्णय दिलेला नाही. त्यामुळे असा ठराव करणे उचित होणार नाही, असे स्पष्ट केले आहे. परिणामी, महापालिका प्रशासनाला शासनाने काही सूचना दिल्यास हा ठराव विखंडनासाठी पाठवला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
बातम्या आणखी आहेत...