आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाेबरा कीसमध्ये तांदूळ चुरीची भेसळ; अन्न, औषध प्रशासनाचे दुर्लक्ष; ग्राहकांची सतर्कता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील व्यापाऱ्यांकडून भेसळयुक्त पदार्थांची विक्री बिनधास्तपणे सुरू अाहे. तरी देखील अन्न औषध प्रशासन विभाग कानाडाेळा करीत असल्याने भेसळीचा धंदा फाेफावला अाहे. संकष्ट चतुर्थीला दाणाबाजारातील घाऊक व्यापाऱ्याच्या दुकानातून विक्री झालेल्या खाेबऱ्याच्या कीसमध्ये चक्क तांदळाच्या चुरीची भेसळ अाढळून अाली अाहे. हा प्रकार नागरिकांनी दुकानदाराच्या लक्षात अाणून दिल्यानंतर त्यांनी खाेबऱ्याचा कीस बदलवून दिला अाहे; परंतु हा प्रकार गंभीर असल्याने याविषयी अन्न औषध प्रशासन विभागाने कडक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली अाहे. 
 
दाणाबाजारातील बाबा हरदासराम ट्रेडिंगमधून ११ अाॅगस्ट राेजी महाबळ परिसरातील जाकीर हुसेन कॉलनीतील सिद्धेश किराणात योगेश चौगुले यांनी खोबऱ्याचा कीस विकत आणला होता. या दुकानातून एका भाविकाने अर्धा किलो खोबऱ्याचा कीस खरेदी केला. संकष्ट चतुर्थी असल्याने त्या भाविकाने महाबळ परिसरातील गणेश मंदिरात पूजा आरती झाल्यानंतर खोबऱ्याचा कीस प्रसाद म्हणून वाटप करण्यात अाला. ताे खाल्ल्यानंतर भाविकांनी क्षणार्धात थुंकून टाकला. त्या खाेबऱ्याच्या कीसमध्ये तांदळाच्या चुरीची भेसळ केल्याचे आढळले. हा प्रकार चाैगुले यांनी दुकानदाराला सांगितल्यानंतर त्याने एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकला. त्यावेळी कीस पाण्यावर तरंगला तर तांदळाची चुरी बुडाशी गेल्याचे आढळून आले. त्यानंतर चौगुले तो खोबऱ्याचा कीस घेऊन बाबा हरदासराम ट्रेडर्समध्ये गेले. त्यांनीही पाकिटावरील मागच्या बाजूने १०, १५ २० टक्के मिक्स असे उत्पादनावर लिहिलेले असल्याचे सांगितले. त्यानंतर खोबरा कीस बदलून दिला. 
 
एफडीएच्या कारभाराबाबत आश्चर्य 
1) आगामी काळात पोळा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी सणांबरोबर दैनंदिन जीवनात आवश्यक खाद्यपदार्थ ग्राहक नेहमीच खरेदी करतात. मात्र, नफेखोर व्यापारी हलक्या प्रतीचा भेसळयुक्त मालाची विक्री करीत आहेत. डाळ, तांदूळ, मिरची पावडर, पेढा, दूध, भगर, शेंगदाणे अादी विविध खाद्य पदार्थांमध्ये सर्रासपणे भेसळ करण्यात येत आहे. 
 
2) सध्या चौकाचौकात प्रतिबंधित खाद्य पदार्थांची विक्री होत आहे. तरी देखील अन्न निरीक्षक कारवाई करीत नसल्याने त्यांच्या कामाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. निरीक्षकाकडून एखादी कारवाई करून इतर व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण करण्यात येते. त्यामागे त्यांचा हेतूही स्पष्ट आहे. 
 
3) जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न औषध प्रशासनाला पाणीपुरी विक्रेते पाण्याची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. या काळातच शहरात शुद्ध पाण्याच्या नावाखाली बीआयएसशिवाय केवळ थंड पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत होता. तरी देखील एफडीएकडून त्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली नसल्याने त्यांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त करण्यात येत अाहे. 
 
ते उत्पादन हैदराबाद येथील 
>सागर नावाचे खोबऱ्याच्या कीसचे प्रॉडक्ट हैदराबाद येथील आहे. आम्ही केवळ वितरक आहोत. त्यामध्ये भेसळ असल्यास संबंधितांना खोबऱ्याचा कीस बदलून देण्यात येईल. तसेच माल कंपनीकडे परत पाठविण्यात येईल.
ईश्वर मेघाणी, मालक, बाबा हरदासराम ट्रेडर्स 
बातम्या आणखी आहेत...