Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» News About Shivam Wankhede Is Dancing Win

जळगावकरांनी दिलेल्या प्रेमामुळेच झालाे विजेता-शिवम वानखेडे

प्रतिनिधी | Apr 21, 2017, 09:26 AM IST

  • जळगावकरांनी दिलेल्या प्रेमामुळेच झालाे विजेता-शिवम वानखेडे
जळगाव-नृत्य स्पर्धेची अंतिम फेरीत पोहोचल्यावर मनावर थाेडेसे दडपण हाेते. मला जिंकण्यासाठी प्रत्येक जळगावकर प्रयत्न करीत होते. त्यामुळे जळगावकरांच्या प्रेमानेच मी विजेता झाल्याची भावना मॅड २ या नृत्य स्पर्धेचा अंतिम विजेता शिवम वानखेडे याने गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
शिवम म्हणाला, निवड चाचणीच्या एक अाठवड्याअाधीच मी सराव केला होता. मग टाॅप १०० नंतर टाॅप १० मध्ये पाेहाेचलाे. दरराेज १५ तास सराव असायचाे. चार महिने घरापासून दूर हाेताे. अनेकदा चांगल्या सादरीकरणासाठी मला उभे राहुन सगळ्यांनी प्रोत्साहन दिले. लावणी करताना मुलीची अदा करणे साेपे नसते. यासाठी मी अनेक लावण्या पाहिल्या, मुलींशी संवाद साधून बाेललाे, त्यांच्यासाेबत राहिलाे अाणि चार तासांच्या मेहनतीने मेकअप वेशभूषेद्वारे मुलगी बनवले तेव्हा मात्र अापाेअाप एका स्त्रीची अदा माझ्यात अाली आणि ते अाव्हानही मी पेलले. तसेच डाेळ्याला पट्टी बांधून केलेले नृत्यही निकालासाठी सकारात्मक ठरले. पुढे नृत्यातच करिअर करणार असल्याचे त्याने सांगितले. त्याला जय चांगरे, बंटी माेटे, जाॅनी महाजन, नम्रता पेंढारकर, ए.एस. इंगळे, रजत यादव यांनी सहकार्य केले. या वेळी शिवमचे नृत्य दिग्दर्शक अखिल तिलकपुरे, अाई सुवर्णा वानखेडे, वडील शिरीष वानखेडे, नरेश बागडे उपस्थित हाेते.
उद्या नागरी सत्कार
शनिवारी बालगंधर्व खुले नाट्यगृहात संध्याकाळी ७ वाजता शिवमच्या नागरी सत्काराचे अायाेजन करण्यात अाले अाहे. यात शिवमचे नृत्य हाेणार असून हा कार्यक्रम जळगावकरांसाठी खुला अाहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी अखिल तिलकपुरे ग्लॅडिएटर डान्स क्लासेस अादर्शनगर यांच्याशी संपर्क साधावा, असे कळवले अाहे.

Next Article

Recommended