आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाैर्य पुरस्कारप्राप्त निशाची मिरवणूक, भडगावात प्रथमच बालशाैर्य पुरस्कार प्राप्त कन्येचा गाैरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भडगाव - येथील आदर्श कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी निशा पाटील हिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशाैर्य पुरस्कार प्रदान करण्यात अाला. त्यानंतर तिचा भडगाव शहरात पहिलाच सत्कार बुधवार, दि.१ राेजी झाला. निशाची मिरवणूक विद्यालयातून सजवलेल्या जीपमधून काढण्यात अाली. 
 
बँड, लेझीम, गरबाच्या तालावर वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात अाली. सुरुवातीला पाच विद्यार्थिनींनी निशाचे औक्षण करून शोभा यात्रेस सुरुवात केली. यात शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, सर्व कर्मचारी, पालक आदी उपस्थित होते. निशा पाटील हिने यशवंतनगर भागात घराला आग लागलेली असताना जीवाची पर्वा करता सात महिन्याच्या मुलीला घरातून वाचवले होते. त्याबद्दल निशाचा राष्ट्रीय बाल शाैर्य पुरस्कार देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गौरवले होते.
 
दिल्लीहून ती परत भडगावात आल्यानंतर तिचे विद्यालयाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत बैलगाडीवर बहिणाबाई चौधरी दालन दळताना, मोटारसायकलवर फेलधारी विद्यार्थिनी, पाच घोड्यांवर फेटेधारी विद्यार्थिनी हाेत्या.
 
किरण बेदी, मदर तेरेसा, संत मीराबाई, कल्पना चावला यांच्या वेशभूषा साकारण्यात अाल्या. शोभायात्रेत शाळेचे अध्यक्ष दीपक महाजन, भिकन महाजन, एकनाथ महाजन, शालिग्राम महाजन, रवींद्र महाजन, बाबुराव पाटील, मंगला पाटील, गोविंदा महाजन, भगवान महाजन , मुख्याध्यापक लतिका वाघ, भीमराज निकुंभ, एस. पी. रोकडे , सविता वाघ, श्वेता जयस्वाल आदी शिक्षक,कर्मचाऱ्यांसह नागरिकही माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. 
बातम्या आणखी आहेत...