आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक किलो चांदीसह चोरट्याला तीन महिन्यांनंतर अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार- अक्कलकुवा येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो चांदीसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
  
१० ऑक्टोबर २०१६ रोजी  अक्कलकुवा येथील पंकज हंसराज जैन यांच्या घराचा दरवाजा तोडत चोरट्याने दाेन किलो चांदी, दाेन तोळे सोन्याचे दागिने व २० हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. या प्रकरणी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अनिल नरपत वसावे यास अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून एक किलो चांदी, सोने तसेच चोरीच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.  पोलिस निरीक्षक गिरीश पाटील, सहायक पोलिस निरीक्षक धनंजय पाटील, रवींद्र लोंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.