आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिग्नलचा वेळ वाढवल्यास कमी हाेईल वाहतूक कोंडी अन् अपघातही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील प्रमुख चाैकांमधील सिग्नलची वेळ वाढवल्यास माेठी वाहने लवकर शहराबाहेर पडतील. त्यामुळे वाहतूक काेंडी अपघाताचे प्रमाण कमी हाेईल, असा निष्कर्ष मुकेश ललवाणी यांनी कालिंका माता मंदिर ते बांभाेरी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत प्रत्यक्ष वाहतुकीचा अभ्यास करून काढला अाहे. तसेच त्यांनी प्रशासनाला काही उपाय सुचवले अाहेत. 
 
 
शहरातून जाणाऱ्या महामार्गावर असलेल्या सिग्नलचा वेळ कमी पडत असल्याने एका वेळी दाेन किंवा तीनच माेठी वाहने सिग्नल अाेलांडून जातात.
 
तर सिग्नलच्या दुचाकी इतर छाेटी वाहने पुढे जाण्याची घाई करतात. त्यामुळे माेठ्या वाहनांच्या सिग्नलवर रांगा वाढत जातात. एका सिग्नलवरून माेठा कंटनेर किंवा ट्रक पास करण्यासाठी ट्रकचालकांना ते वेळा सिग्नल सुटू द्यावा लागताे. सिग्नलवर वाया गेलेला वेळ भरून काढण्यासाठी ट्रकचालक अनेक वेळा सुसाट वाहने चालवतात. 
 
तातडीचे उपाय गरजेचे : महामार्गाच्या दाेन्ही बाजूने महामार्ग अाेलांडणाऱ्या वाहनांसाठी सध्याची सिग्नलची वेळ पुरेशी अाहे; परंतु महामार्गावरून जाणाऱ्या माेठ्या वाहनांसाठी सिग्नलची वेळ दुप्पट करणे अावश्यक अाहे. तसेच पाेलिसांनी एखाद्या ट्रकमध्ये बसून कालिंका माता मंदिर ते बांभाेरी अभियांत्रिकीपर्यंत अनुभव घ्यावा, असे सुचवले अाहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, पाेलिस अधीक्षक, अामदारांना निवेदन दिले अाहे. 
 
कारवाईमुळे काेंडी 
सिग्नलच्या कमी वेळेमुळे ट्रक चाैक अाेलांडत असताना सिग्नलमध्येच बंद हाेताे. अशावेळी चाैकातच ट्रक अडकलेली असते. अशी वाहने हेरून वाहतूक पाेलिस कारवाईचे साेपस्कार पूर्ण करतात. सिग्नलची कमी वेळ, पाेलिसांची कारवाई, यामुळे मानसिक संतुलन खराब झालेले चालक चिडचिड करीत, शिव्या देत भरधाव वाहने हाकतात. या प्रकारामुळे देखील अपघात हाेण्याची शक्यता असते. 
बातम्या आणखी आहेत...