आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: जनमतापुढे शासन झुकले; सहा रस्ते हस्तांतरणाचा निर्णय रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दारू विक्रेत्यांच्या साेयीसाठी जळगाव शहरातील सहा रस्ते महापालिकेकडे वर्ग करण्याच्या हालचाली शासनस्तरावर सुरू झाल्या हाेत्या. मात्र, जनमताच्या रेट्यापुढे अाणि अांदाेलनापुढे झुकत शासनाला अवर्गीकृत केलेले सर्व सहाही रस्ते पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घ्यावा लागला. या अादेशामुळे दिलासा मिळालेल्या ४५ दारूची दुकानांना पुन्हा कुलूप लागणार अाहे.   

सर्वाेच्च न्यायालयाने राष्ट्रीय व राज्य मार्गापासून ५०० मीटर अंतरावरील सर्व दारूची दुकाने व परमीट रूम, बिअर बार एक एप्रिलपासून बंद करण्याचे अादेश दिले अाहेत. त्यानुसार जळगाव शहरातील १०२ दारू दुकाने व परमीट रूम, बिअर बारपैकी ८७ दुकानांना कुलूप लागणार हाेते. मात्र, या निर्णयामुळे धाबे दणाणलेल्या दारू विक्रेत्यांनी राजकीय ताकद वापरत शासनाकडून ३१ मार्च राेजी शहरातील सहा रस्ते महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा अादेश काढला हाेता. त्यामुळे ८७ पैकी पुन्हा ४५ दुकान व परमीट रूम, बिअर बारला दिलासा मिळाला हाेता. मात्र, दारू विक्रेत्यांना फायदेशीर ठरणाऱ्या या निर्णयाविराेधात ‘जळगाव फर्स्ट’ या संघटनेच्या माध्यमातून शहरात जनअांदाेलन उभारण्याची तयारी सुरू झाली हाेती. स्वाक्षरी माेहिमेत तब्बल १३ हजार नागरिकांनी सहभागी हाेत शासनाच्या निर्णयाला विराेध केला. त्यानंतर महापालिकेनेही जनभावनेचा अादर करत शासनाचा अादेश रद्द करण्याचा ठराव शासनाकडे पाठवला हाेता. यासंदर्भात शासनाने ४ मे राेजी अादेश काढत अवर्गीकृत केलेले सहा रस्ते पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात घेत असल्याचा निर्णय घेतला अाहे.    
देखभाल दुरुस्ती शासन करेल : जळगावात नगरपालिका असताना २००२ मध्ये सहा रस्त्यांसंदर्भात करण्यात अालेल्या ठरावाचा अाधार घेत राज्य शासनाने हे सहा रस्ते अवर्गीकृत केले हाेते. परंतु पालिकेची तेव्हाची व अाताची अार्थिक परिस्थिती पाहता हा निर्णय याेग्य नसल्याचे मत मांडण्यात अाले. यासंदर्भात शासनाने अापला ३१ मार्चचा अादेश रद्द करत ते सहा रस्ते पुन्हा साबां विभागाच्या ताब्यात घेतले अाहेत. 
 
हा जनभावनेचा विजय   
- सर्वोच्च न्यायालयाच्या उदात्त हेतूला हरताळ फासण्यासाठी पळवाट  काढण्यासाठी प्रयत्न करण्यास आता कुणी धजावणार नाही, अशी अाशा बाळगूया. जळगावकरांचा समंजसपणा, संवेदनशीलतेचा  हा विजय आहे.   
- डाॅ. राधेश्याम चाैधरी, ‘जळगाव फर्स्ट’
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...