आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव स्मार्ट सिटीसाठी विद्यार्थी सरसावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- स्मार्टसिटी स्पर्धेतून जळगाव शहर बाहेर पडलेले असले तरी जळगावला स्मार्ट करण्यासाठी विद्यार्थी सरसावले अाहेत. त्यांनी शहराचा कायापालट करण्यासाठी इंडस्ट्रीयल काॅरिडाॅर व्हावा, अायातीपेक्षा निर्यातीवर भर द्यावा, तसेच गुंतवणुकीला प्राेत्साहन, सूक्ष्म, लघु अाणि मध्यम उद्याेगांना एका दिवसात सर्व परवाने पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा उपाययाेजना सुचवल्या अाहेत.

रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे ‘माय इंडिया माय व्हिजन’ पाॅवर पॉइंट प्रेझेंटेशनची अंतिम स्पर्धा रविवारी कांताई सभागृहात झाली. ‘स्मार्ट सिटी’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्हिजन-२०३०’मधील भारताबद्दल विद्यार्थ्यांनी आपली मते प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडली.
‘स्मार्ट सिटी’चा पहिला टप्पा विकसित सिटीचा आहे. त्यामध्ये रस्ते, पाणी, उद्योग, शिक्षण, रोजगार, आरोग्य सुविधा, वीज, दळणवळण, इमारती या पायाभूत सुविधांची उभारणी आवश्यक आहे. या पायाभूत सुविधा उभारल्यानंतर स्मार्ट पार्किंग, ट्रॅफिक व्यवस्थापन, ई-कॉमर्स, जनतेची सुरक्षा, सोलर ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन आदी बाबींच्या आधारे शहर स्मार्ट बनू शकेल. तसेच ई-व्हिसा, डिजिटल इंडिया आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीची सुविधाही स्मार्ट सिटीमध्ये उपलब्ध करून द्याव्या, नियोजित स्मार्ट सिटीची संकल्पना आखून ती नावीन्यपूर्णतेने अमलात आणायला हवी असेही सांगितले.

‘लोकल टू ग्लोबल’ वर विद्यार्थ्यांचा भर
शहरस्मार्ट बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाॅवर पॉइंट प्रेझेंटेशनमध्ये ‘लोकल टू ग्लोबल’वर भर दिला. घराघरात ब्रॉडबॅण्डसह ई-लाइफ सुविधा हवी. ई-लाइफ ही प्रगत असलेली सुविधा आहे. तसेच आता थेट घरीच आरोग्य सुविधा उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर इंटरनेट वाय-फाय या सुविधाही स्मार्ट सिटीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाव्यात. याशिवाय नागरिकांना सुरक्षा मिळाली पाहिजेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ट्रॅफिकसह टाकाऊ कचरा वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन अत्यावश्यक आहे.

शहराची बलस्थानेे
सतापी,गिरणा या नद्यांमुळे शेतीला लाभलेली समृद्धता, औद्याेगिक वसाहत, विद्यापीठ, विमानतळ, रेल्वे या पायाभूत सुविधा जळगाव शहरात आहेत. याला जोडूनच सामाजिक, सांस्कृतिक आर्थिक विकास, तत्पर प्रशासन, गरिबांना आर्थिक स्थिरता, कुशल मनुष्यबळ, रोजगार, तंत्रज्ञानाचा वापर, कुशल व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, डिजिटलायजेशनबरोबरच पाणी, रस्ते, वीज, दळणवळण, इमारती या सर्व गरजा पर्यावरणपूरक पद्धतीने निर्माण केल्यास जळगाव निश्चितच ‘स्मार्ट सिटी’ बनू शकेल, अशा प्रकारे नववी दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील कल्पना प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मांडल्या. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध पर्याय सुचवले. त्याची अंमलबजावणी केल्यास शहर नक्की स्मार्ट हाेईल.

स्मार्ट सिटीचा पाया
विकसितसिटी, इलेक्ट्राॅनिक सिटी मोबाइल सिटीनंतरच्या टप्प्यात स्मार्ट सिटीचा प्रवास सुरू होतो. त्यामध्ये डिजिटल अर्थव्यवस्था, ई-बिझनेस ई-सोसायटीची ग्लोबल लिंक असायला हवी. घरांमध्ये ब्रॉडबॅण्ड सेवा, वाय-फाय, ई-लाइफ सेवा, ई-बिझनेस, नावीन्यपूर्ण सेवा अाणि ई-गव्हर्नमेंट आवश्यक आहे.

जळगावातपायाभूत सुविधा
जळगावातविमानतळ रेल्वे सुविधेबरोबर औद्योगिक वसाहतही आहे. त्यामुळे आयात-निर्यात करणे शक्य आहे. त्याचबरोबर तापी गिरणाा नद्यांमुळे आर्थिक सुबत्ता लाभली आहे. या आधारे जळगाव ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करू शकेल, अशी आशाही व्यक्त केली.
सुखद सोमवार