आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेरीवाल्यांचे लवकरच पुनर्वसन; वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील साक्री रोड परिसरात फेरीवाला झोनचे सुरू असलेले काम. - Divya Marathi
शहरातील साक्री रोड परिसरात फेरीवाला झोनचे सुरू असलेले काम.
धुळे - शहरातील विविध भागातील रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या फेरीवाल्यांना स्वतंत्र जागा दिली जाणार आहे. त्यानुसार साक्री रोडवरील महापालिकेची शाळा क्रमांक १४मध्ये फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी आमदार अनिल गोटे यांच्या निधीतून ओट्याचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने सर्व फेरीवाल्यांना जागा मिळाल्यानंतर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
शहरातील पाचकंदील, आग्रा रोड, फुलवाला चौक, महात्मा गांधी पुतळा, चैनी रोड आदी भागात फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या भागात रोज वाहतुकीची कोंडी होते. त्यातच या भागातील रस्ते अतिशय अरुंद असल्याने हा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. अनेकदा या भागात पायी चालणेही मुश्कील होते. पाचकंदील परिसरात रस्त्याच्या चारही बाजूला फेरीवाले थांबत असल्याने वाहतूक पोलिसांना या भागातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्याचबरोबर शहरातील पारोळा रोड, साक्री रोड, दत्त मंिदर, जयहिंद कॉलनी, देवपूर भागात फेरीवाले थांबलेले असतात. त्यामुळे फेरीवाल्यांना कायमस्वरूपी स्वतंत्र जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात येणार आहे. जेथे फेरीवाला क्षेत्र असेल तेथेच आगामी काळात फेरीवाल्यांना थांबवावे लागले. फेरीवाला क्षेत्रात फेरीवाल्यांना विविध प्राथमिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. शहरात चार ते पाच ठिकाणी फेरीवाला क्षेत्र तयार करण्यात येणार आहे. त्यात देवपूर, साक्री रोडचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात साक्री रोडवरील महापालिकेची शाळा क्रमांक १४ येथे फेरीवाला क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्याच ठिकाणी आमदार अनिल गोटे यांच्या निधीतून ओट्याचेही बांधकाम होत आहे. इतर ठिकाणीही काम सुरू होणार आहे.
पार्किंग झोनही करावे
पार्किंगचा प्रश्नही गंभीर झाला आहे. तो सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. शहरातील एकाही भागात महापालिकेने पे अॅण्ड पार्कची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.

वाहतूक कोंडी सुटणार
शहराचाविस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. त्याप्रमाणे शहरातील नागरी सुविधांमध्येही वाढ होणे अपेक्षित आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनातर्फे शहरातील नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यात फेरीवाला क्षेत्राचाही समावेश आहे. फेरीवाला क्षेत्राचे काम तातडीने झाल्यास शहरातील वाहतूक कांेडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी जागा मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...