आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीस हजार खेळाडू उतरले मैदानात; स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांची भरली जत्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- अामदार कुणाल पाटील यांनी फुटबाॅलला किक मारून स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांच्या सामन्यांना प्रारंभ केला. सामने चुरशीने खेळले जात असताना विद्यार्थ्यांची स्टेडियममध्ये जणू जत्रा भरली हाेती. विद्यार्थ्यांना फुटबाॅल खेळाचे महत्त्व कळावे यासाठी शहरभरातील शाळांचे विद्यार्थी गरुड संकुल जिल्हा क्रीडा मैदानात जमले हाेते. जिल्हाभरात सगळ्याच शाळांमध्ये फुटबाॅलचा कुंभ फुलला हाेता. यात एकाच दिवशी तब्बल २० हजार खेळाडूंनी फुटबॉल खेळल्याची एेतिहासिक नोंद झाली. 

जिल्ह्यातील ४५० शाळांमध्ये शुक्रवारी फुटबॉल स्पर्धा झाल्या. या स्पर्धेतून २० हजार फुटबॉल खेळाडूंनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. शहरातील गरुड मैदान आणि जिल्हा क्रीडा संकुलातही फुटबॉलचे सामने झाले. क्रीडा संकुलाच्या मैदानाला तर फुटबॉल स्पर्धेमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळी वाजता एकाच वेळी सर्वत्र फुटबाॅल सामने झाले. विशेष बाब म्हणजे शहरातील दोन्ही मोठ्या मैदानांवर दिवसभर फुटबॉल मॅचेस सुरू हाेत्या. काही विद्यार्थी खेळून थकल्यानंतर ते बाजूला होत हाेते. त्यानंतर नव्या दमाचे विद्यार्थी-खेळाडू मैदानात उतरून फुटबॉलच्या रंगात रंगून जात होते. 
 
जिल्हा क्रीडा संकुलातील फुटबॉल स्पर्धेचे उद‌्घाटन आमदार अनिल गोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव रईस काझी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडाधिकारी संजय सबनीस यांनी केले. सूत्रसंचालन क्रीडाधिकारी सुजाता गुल्हाणे यांनी तर आभार ए. आर. बोथीकर यांनी मानले. स्पर्धेसाठी क्रीडा मार्गदर्शक जगदीश राजेशिर्के, जगदीश चौधरी यांचे सहकार्य लाभले. 

या वेळी क्रीडा प्रशिक्षक हेमंत भदाणे, प्रभाकर चौधरी, मनोहर चौधरी, संदीप बाविस्कर, बागुल, शिंदे, एस.पी. पाटील उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी योगेश देवरे, योगेश पाटील, चव्हाण यांनी परिश्रम घेतले. 
 
खेळांमुळे वाढेल सकारात्मकता... 
मैदानी खेळांमुळे युवा पिढीचे शरीर मन स्थिर होण्यास मोठी मदत होणार आहे. जिल्हाभरात होणाऱ्या या स्पर्धांमधून मोठ्या प्रमाणात खेळाडूंनी पारितोषिके प्राप्त करून जिल्ह्याला नावलौकिक मिळवून दिला पाहिजे. पूर्वी प्रमाणे मैदानात खेळणाऱ्या खेळाडूंचे प्रमाण कमी झालेले आहे. त्यासाठी अशा प्रोत्साहनपर कार्यक्रमांची गरज आहे. 
- डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी 
 
सुदृढ आरोग्यासाठी घ्यावा आनंद 
ई-गॅझेटकडे शालेय विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असून, मैदानी खेळांचे प्रमाण कमी होत आहे. आजची युवा पिढी विविध खेळांचे सामने मैदानावर कमी तर मोबाइल किंवा संगणकावर अधिक प्रमाणात खेळताना दिसतात. सुदृढ आरोग्यासाठी मुलांनी मैदानावर येऊन फुटबॉलसह सर्वच खेळांचा आनंद लुटावा. 
- अामदार अनिल गोटे 
 
ऑनलाइन झाली नोंदणी 
महाराष्ट्रमिशन-१ मिलियन फुटबॉल क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात जिल्ह्यातून १९ हजार क्रीडापटूंची नोंदणी करण्यात आली. या स्पर्धांसाठी शहरासह जिल्ह्यातील ४५० शाळांनी सहभाग नोंदवला. महाविद्यालयांमध्येही स्पर्धा रंगल्या. शाळांना प्रत्येकी तीन फुटबॉल देण्यात आले. शाळांनी फुटबॉल सामन्यांची माहिती व्हॉट‌्सअॅप, ई-मेलद्वारे जमा करण्याचे आवाहन केले. 
 
आमदारांनाही घेतला सहभाग... 
क्रीडासंकुलात आयोजित फुटबॉल स्पर्धेसाठी आमदार कुणाल पाटील यांनीही हजेरी लावली. सर्वत्र फुटबॉलमय वातावरण झालेले असताना आमदार पाटील यांनाही फुटबॉलला किक मारण्याचा मोह आवरता आला नाही. 
 
सेल्फी पाॅइंटवर विद्यार्थ्यांची गर्दी 
मिलियनफुटबॉल जनजागृतीसाठी क्रीडा संकुलात सेल्फी पाॅइंट तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सकाळपासून विद्यार्थी, खेळाडू, प्रशिक्षक, शिक्षक क्रीडा रसिकांची सेल्फी काढण्यासाठी गर्दी झाली होती.    
 
बातम्या आणखी आहेत...