आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : पेट्रोल पंपावर मापात पाप; ग्राहकांचा गोंधळ, वजन मापेकडून तपासणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीकृष्ण पेट्रोलपंपावर पाच लिटरच्या मापात भरलेले पेट्रोल तपासताना वजनमापे निरीक्षक सी.डी. पालीवाल ग्राहक. - Divya Marathi
श्रीकृष्ण पेट्रोलपंपावर पाच लिटरच्या मापात भरलेले पेट्रोल तपासताना वजनमापे निरीक्षक सी.डी. पालीवाल ग्राहक.
जळगाव - पंचमुखी हनुमान मंदिराजवळील श्रीकृष्ण पेट्रोल पंपावर गुरुवारी दुपारी वाजता पेट्राेल कमी दिल्याच्या कारणावरून ग्राहकांनी गोंधळ घातला. ग्राहकाने त्याची शंका तपासून पाहण्यासाठी पांडे डेअरी चौकातील पंपावरून सारख्याच बॉटलमध्ये ३० रुपयांचे पेट्रोल अाणले. यात निम्मा फरक जाणवल्याने संतापलेल्या ग्राहकांनी तक्रार करून वजन मापे निरीक्षकांना पंपावर बोलावले. निरीक्षकांनी पाच लिटर पेट्रोलचे आकारमान मोजल्यावर त्यातही पेट्रोल फरक जाणवल्याने त्यांनी पंपाचे सर्व मशीन सील करण्याचा निर्णय घेतल्याने वादावर पडदा पडला. 
 
श्रीकृष्ण पेट्रोल पंपावर गुरुवारी दुपारी वाजता गॅरेज मालक इरफान शेख गफ्फार विनोद आॅटाे गॅरेजवरील मेकॅनिक पराग कोचुरे हे पेट्रोल भरण्यासाठी आले होते. ३० रुपयांचे पेट्रोल घेतल्यावर ते निम्मे कमी असल्याची शंका आल्याने त्यांनी लागलीच पांडे डेअरी चौकातील दुसऱ्या पंपावरून सारख्या बाटलीत ३० रुपयांचे पेट्रोल मागवले. ते पेट्रोल या पंपापेक्षा दुप्पट होते. त्यामुळे श्रीकृष्ण पंपावर पेट्राेल घेण्यासाठी अालेल्या सर्व ग्राहकांनीच एकत्र येऊन तक्रार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पराग कोचुरे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फाेन केला. मात्र, ते नागपूर येथे गेले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वजनमापे कार्यालयास कळवण्यात आले. वजनमापे निरीक्षक सी.डी. पालीवाल हे पेट्राेल पंपावर अाल्यानंतर ग्राहकांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी सर्वांसमक्ष लिटर पेट्रोल मापात काढण्यास सांगितले. त्यात ३० मिलिलिटर पेट्रोल कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पंपावरील चारही यंत्रांची तपासणी करण्यात आल्यावर डिझेल २० मिली लिटर कमी भरत असल्याचे निष्पन्न झाल्याने ग्राहकांची फसवणूक हाेत असल्याची निरीक्षकांची खात्री पटली. त्यामुळे त्यांनी पंपाचे सर्व मशीन सील करण्याचा निर्णय घेतल्याने वादावर पडदा पडला. 

नोटीस देणार 
- सर्व ग्राहकांस मक्षलिटर पेट्राेल यंत्राद्वारे मापात भरल्यानंतर ते ३० मिली कमी भरले. संबंधित पंपावरील मशिनींना सील लावून नोटीस दिली जाईल. तांत्रिक बाबींचा विषय तहसीलदार किंवा पुरवठा अधिकारी यांच्या अख्त्यारितील असल्याने त्यांच्याकडून पुढची कारवाई होईल. सी.डी.पालीवाल, वजनमापे निरीक्षक 
 
कंपनीकडे तक्रार 
- पूर्ण पैसे घेऊन पेट्रोल कमी दिल्याबाबत मी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे. त्यांनी नागपूरला असल्याचे सांगितल्याने वजन मापे निरीक्षकांकडे तक्रार दिली. अनेक दिवसांपासून ग्राहकांची अशाच पद्धतीने लूट सुरू अाहे.
पराग कोचुरे, ग्राहक 
 
पुढील स्लाइडवर वाचा, पंपात चीप सर्किट आणि तापमानाने बाष्पीभवन... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...