आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: रुळांवर घातपाताचे पाच वेळेस प्रयत्न, पाेलिसांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- सध्या रेल्वे रुळांवर दगड किंवा लोखंडी साहित्य ठेवून घातपात घडवण्याच्या प्रयत्नांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात जळगाव जिल्ह्यातही रुळांवर मोठ्या आकाराचे दगड ठेवल्याच्या पाच घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातही सतर्कता आवश्यक आहे, अशा सूचना सहायक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिल्या. 

रेल्वे रुळांवर दगड ठेवण्याचे प्रकार अलीकडे उघड झाल्याने त्या पार्श्वभूमीवर सहायक अधीक्षक नीलोत्पल यांनी सोमवारी सायंकाळी आपल्या कार्यालयात बैठक घेतली. रेल्वेत घातपात घडवण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे, अशा सूचना नीलोत्पल यांनी दिल्या. भुसावळ विभागात अाेढा (जि.नाशिक)जवळ रेल्वेमार्गावर लाेखंडाचा तुकडा ठेवण्यात अाला हाेता. वेळीच रेल्वेचालकाच्या लक्षात हा प्रकार अाल्यामुळे माेठा अपघात टळला. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. ज्या गावाजवळून रेल्वेमार्ग जातो, तेथील स्थानिक लोकांशी संपर्क वाढवून प्रत्येक गावात आपले स्राेत निर्माण करा पोलिसमित्रांची मदत घेऊन अप्रिय घटनांना आळा घाला, अशा सूचना देण्यात आल्या. 

गुन्हेगारांवर लक्ष ठेवा 
आरपीएफ,जीअारपीसोबतच पाेलिस यंत्रणेने गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. यादीवरील गुन्हेगार सध्या काय करतात? त्यांचा व्यवसाय आणि मित्रांची माहिती काढावी. प्रसंगी त्यांना चाैकशीसाठी ताब्यात घ्यावे. देशविघातक शक्तींना स्थानिक व्यक्ती मदत करत असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे नीलाेत्पल यांनी सांगितले. 

अधिकाऱ्यांची उपस्थिती 
पाचाेऱ्याचेडीवायएसपी केशव पाताेंड, चाळीसगावचे डीवायएसपी अरविंद पाटील, फैजपूरचे डीवायएसपी अशाेक थाेरात, जीअारपीचे सहायक पाेलिस निरीक्षक उज्ज्वल पाटील यांच्यासह अारपीएफ, अायबी, एसआयडी, सीबीआय क्राइम इंटेलिजन्स ब्यूराेचे अधिकारी बैठकीला उपस्थित हाेते. 
बातम्या आणखी आहेत...