आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामुष्की: चाेपडा साखर कारखाना ऊस नसल्याने सोमवारपासून बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा - चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना यावर्षी अधिकच अडचणीत सापडला हाेता. कोणत्याही बँकेकडून अर्थसाह्य घेता कारखाना जेमतेम सुरू करण्यात आला होता. मात्र, भर हंगामात केवळ १९ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केल्यानंतर कारखाना बंद करण्याची पहिलीच वेळ अाली अाहे. केवळ ३५ दिवस कारखाना सुरू राहिला. जानेवारीपासून शेतकऱ्यांनी कारखान्यात ऊस अाणू नये, असे अावाहन कारखान्याचे संचालक मंडळाने केले. 

यावर्षी चोपडा साखर कारखाना डिसेंबर रोजी सुरू केला होता. बाहेरच्या कारखान्यांनी ऊस पळवल्यामुळे भर हंगामात कारखाना बंद करण्याची नामुष्की अाेढावली अाहे. जानेवारी अखेर १८ हजार ४५५ मेट्रिक टन ऊस गाळप झाला. १० हजार ५२५ साखर पोत्यांची निर्मित झाल्याची माहिती मिळाली आहे. 

सर्वपक्षीयनेत्यांना अपयश 
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, भाजप नेते घनश्याम अग्रवाल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने कोणत्याही बँकेकडून कर्ज घेता खासगी व्यापाऱ्यांकडून पैसे उचल करून कारखाना सुरू केला. मात्र, कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस चोसाकाला मिळेल यासाठी कुठेही ठोस असे प्रयत्न केल्यामुळे ऊसच जेमतेम मिळत गेला. त्यामुळे कारखाना अधिकच आर्थिक संकटात सापडून तो बंद करण्याची नामुस्की ओढवली असून सर्वपक्षीय नेत्यांना ते अपयश आहे, असेच म्हणावे लागेल. 

जनरलसभेत घेतला पाहिजे होता निर्णय 
कारखाना कार्यक्षेत्रात जेमतेम ऊस होता आणि तोही बाहेरचे कारखाना चोसाका सुरू होण्याअगोदरपासून पळवत होते, ही परिस्थिती सर्व माहिती असताना देखील कारखाना बंद ठेवावा की सुरू हा निर्णय ऊस उत्पादक सभासदांना जनरल सभा बोलावून घेतला गेला पाहिजे होता, असे बोलले जात आहे. म्हणजे आज भर हंगामात चोसाका बंद करण्याची नामुश्की कारखान्यावर ओढवली नसती. 
 
 
शेतकऱ्यांनी बाहेर ऊस दिला
- कार्यक्षेत्रात उभाअसलेला ऊस शेतकऱ्यांनी बाहेर दिला आणि पाच, सात कारखान्यांनी तो ऊस पळवला. कारखाना जेमतेम कोणत्याच बँकेने अर्थसाह्य देतासुद्धा खासगी व्यापाऱ्याच्या सहकार्याने सुरू केला. मात्र, ऊसच शिल्लक नसल्याने जानेवारीनंतर कारखाना बंद करीत असलो तरी पुढच्या वर्षी कारखाना चांगल्या प्रकारे सुरू करता येईल यासाठी तत्पर राहू. 
नीतासंभाजी पाटील, चेअरमन, चोसाका 

कारखान्यांनी ऊस पळवला 
या वर्षीकारखान्याची सर्वाधिक हलाकीची परिस्थिती होती, कारखाना कार्यक्षेत्रात केवळ लाख ३५ हजार मेट्रिक टन ऊस उभा असताना पहिल्यांदा चोपडा कारखाना कार्यक्षेत्रात मधुकर साखर कारखाना फैजपूर, कन्नड कारखाना, मुक्ताईनगर कारखाना, संजीवनी कोपरगाव, दाभाडी कारखाना, शहादा कारखाना, पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखाने असे एकूण सात कारखान्यांनी ऊस पळवला. यावर्षीच एवढे कारखाने का आले? यामागे कोणाची शक्ती आहे का? कारखाना बंद पाडायचा आहे का? कोणाचे राजकारण आहे, असे अनेक प्रश्न पुढे येत आहेत. 

पुढच्या वर्षी जोमाने सुरू करू 
- या वर्षीचोपडाकारखाना कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरच्या कारखान्याने पळवल्यामुळे चोसाकात अत्यल्प ऊस अाला. त्यामुळे कमी क्रसिंग झाले. पुढच्या वर्षी साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस फक्त तालुक्यातून येईल, अशी तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांनी देखील यावर्षी बाहेर ऊस देणे पसंत केले. त्यामुळे जानेवारीपासून शेतकऱ्यांनी चोसाकात आपला ऊस आणू नये.
एस.डी. चव्हाण, कार्यकारी संचालक, चोसाका 
बातम्या आणखी आहेत...