आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: आईचा वाढदिवस साजरा करून मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील हनुमान नगरमधील रहिवासी विक्की राजकुमार रत्नानी (वय ३०) याने मंगळवारी रात्री घरात गळफास घेऊन अात्महत्या केली. विशेष म्हणजेच मंगळवारी त्याच्या आईचा वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा झाल्यावर ही खळबळजनक घटना घडली. 
हनुमाननगरमधील रहिवासी विक्की रत्नानी यांनी मंगळवारी रात्री १२.३० ते १.१५ वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस येताच कुटुंबातील सदस्यांनी विक्कीला डाॅ. मानवतकर हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. मात्र, तपासाअंती डाॅ. मानवतकर यांनी विक्कीला मृत घोषित केले. 
 
यानंतर मृतदेह जळगाव येथे हलवण्यात आला. तेथे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात सोपवण्यात आला. याप्रकरणी प्रकाश रमेश बत्रा यांच्या खबरीवरून बाजारपेठ पाेलिस ठाण्यात अाकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली. बाजारपेठ हवालदार अानंदसिंग पुढील तपास करीत अाहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...