आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटना एक नोंदी दोन, मृत्यूनंतरही मायलेकींची अशी झाली ताटातूट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिरूड कॉलनीतील मनीषा गवळे यांचे राहते घर. - Divya Marathi
भिरूड कॉलनीतील मनीषा गवळे यांचे राहते घर.
भुसावळ - शहरातील भिरूड काॅलनीमधील गवळे परिवारातील मायलेकींनी रविवारी (दि.१६) रात्री रेल्वेखाली अात्महत्या केली. या घटनेत आईचा मृतदेह डाऊन, तर मुलीचा मृतदेह अप लाइनवर होता. यामुळे बाजारपेठमध्ये मुलगी, तर शहर पोलिस ठाण्यात आईच्या अकस्मात मृत्यूची स्वतंत्र नोंद झाली. मृत्यूनंतरही हद्दीमुळे मायलेकींची ताटातूट झाली. 
 
भिरूड कॉलनीतील रहिवासी मनीषा लक्ष्मण गवळे (वय ३६) आणि त्यांची मुलगी दिव्या लक्ष्मण गवळे (वय १७) या मायलेकींनी रविवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास रेल्वे उड्डाण पुलाखाली आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली. दरम्यान, अप लाइन बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते. या लाइनवर दिव्याचा मृतदेह, तर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डाऊन लाइनवर मनीषा यांचा मृतदेह आढळला. त्यामुळे मायलेकींच्या आत्महत्येप्रकरणी दोन्ही ठिकाणी स्वतंत्र नोंद झाली, तर तीन वर्षांच्या प्राची हिच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. 

एका वेळी अंत्ययात्रा 
गवळे यांना तीन मुली अाहेत. दिव्या ही सर्वात माेठी. तिने नुकतीच १२वी, तर पायलने १०वीची परीक्षा दिली. पायलनंतर तीन वर्षांची प्राची अाहे. दरम्यान, सोमवारी शवविच्छेदनानंतर दुपारी भिरूड कॉलनीतून मायलेकींची एकाच वेळी अंत्ययात्रा निघाली. 

अकस्मात मृत्यूची नाेंद 
- रेल्वेची डाऊनलाइन शहर, तर अप लाइन बाजारपेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत अाहे. दिव्याचा मृतदेह अप तर, तिची आई मनीषाचा मृतदेह डाऊन लाइनवर होता. यामुळे बाजारपेठ शहर पोलिस ठाण्यात वेगवेगळी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नीलाेत्पल,सहायक पाेलिस अधीक्षक
 
उद्यानासाठी तगादा 
तीन वर्षांची प्राची सायंकाळी शेजारील चाैधरींसाेबत उद्यानात जाणार हाेती. त्यासाठी तिने आईकडे तगादा लावला होता. मात्र, आई मनीषा संतापातच प्राचीला घेऊन घरातून बाहेर पडली. पुढे त्यांनी आत्महत्या केली. या वेळी चिमुरडी प्राचीदेखील आईसोबत होती. या घटनेत ती बालंबाल बचावली. मात्र, तिला गंभीर इजा झाली आहे. 
 
देव तारी त्यास... 
रेल्वेच्याअप-डाऊन मार्गावर दाेन्ही मायलेकींचे मृतदेह पडले हाेते, तर तीन वर्षांची प्राची तिच्या आईच्या मृतदेहाच्या बाजूला जखमी अवस्थेत पहुडली हाेती. तिच्या डाेक्याला इजा झाली आहे. दरम्यान, पाेलिस काही शहरवासीयांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावली. यानंतर प्राचीला गाेदावरी हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात आले. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेत प्राचीची आई आणि बहीण दगावली असली तरी, ‘देव तारी त्यास कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय आला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...