आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर आत्महत्या करणाऱ्या कल्पेशवर दाखल होऊ शकतो गुन्हा, प्रेम प्रकरणातून आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरापासून जवळ असलेल्या बिलाडी शिवारातील विहिरीत आत्महत्या करणाऱ्या तरुण तरुणीच्या मृत्यू प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे; परंतु या नोंदीमध्ये त्यांना अनोळखी संबोधण्यात आले आहे. कल्पेश नंदन हिमानी पाटील यांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर गुरुवारी कुटुंबीयांना देण्यात आले. या प्रकरणी कल्पेशवर मरणोत्तर गुन्हाही दाखल होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली अाहे. 
 
बिलाडी शिवारातील एका विहिरीत कल्पेश हिमानी यांचे मृतदेह काल बुधवारी आढळून आले. या प्रकरणी काल बुधवारी सायंकाळी सात वाजून एक मिनिटांनी देवपूर पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली; परंतु दाेघांना या नोंदीमध्ये अनोळखी संंबोधण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतर देवपूर पोलिसांनी त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. शिवाय वारस पावतीवर कुटुंबीयांची स्वाक्षरी घेतली. 
 
दोन्ही कुटुंबीय दु:खात असल्यामुळे त्यांचे जबाब इतर काही नोंदी घेण्याचे काम राहिले आहे. यानंतर कल्पेशचा मृतदेह घेऊन त्याचे कुटुंबीय नंदुरबारकडे रवाना झाले. दरम्यान, विहिरीत उडी मारल्यावर हिमानी हिने बचावाचा प्रयत्न केला; परंतु कल्पेशने तिला पाण्यात खेचले, अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यामुळे पोलिस पुन्हा या बाजूने तपास करत आहेत. तपासात तसे सिद्ध झाल्यास मृत कल्पेशविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकतो, असेही पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले. 
 
अॅबेटसमरीचा पर्याय 
मरणोत्तर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये तसे झाले आहे. मृत व्यक्तीला जिवंत मानून तपासाला सुरुवात केली जाते. एवढेच नव्हे तर न्यायालयात दाखल होणाऱ्या दोषारोपपत्राला मरणोत्तर दोषारोपपत्र असे म्हटले जाते. यानंतर मृत व्यक्तीविरुद्ध खटलाही चालवला जाते. यात मृतकाला शिक्षाही होऊ शकते. मृतकाच्या नावाने बऱ्याचदा नातलग वकीलही लावतात. अशा प्रकरणांना कायदेशीर शब्दात अॅबेट समरी संबोधतात, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 
 
तपासानंतर निर्णय 
- अद्याप तक्रारआलेली नाही; परंतु तक्रार आल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो; परंतु त्यासाठी सर्व बाबी सखोल तपासल्या जातील. शिवाय वस्तुस्थितीजन्य पुरावा, साक्षीदारांचे जबाब घेतले जाऊ शकतात. त्यात तथ्य आढळून आले तरच गुन्ह्याची प्रक्रिया राबवली जाऊ शकते. -बी.ओ. सोनवणे, सहा पोलिस निरीक्षक 
बातम्या आणखी आहेत...