आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुकन्या समृद्धी योजने’ची 15 हजार खाती; सव्वासहा कोटींच्या ठेवी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - भारतीय डाक विभागातर्फे सुकन्या समृद्धी योजनेला भुसावळ विभागात चांगला प्रतिसाद आहे. विभागातील सर्व पोस्ट कार्यालयांतून या योजनेच्या माध्यमातून १४ हजार ८३९ खाती उघडण्यात आली असून त्यात तब्बल सव्वासहा कोटी रुपयांचा भरणा झालेला आहे. 
भारतीय डाक विभागाने डिसेंबर २०१४पासून सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. ही योजना भुसावळ विभागातील मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ, नशिराबाद, यावल, फैजपूर, रावेर, सावदा, साकळी, अडावद, चोपडा, नशिराबाद, धानोरा आदी पोस्टाच्या उपविभागांतून राबवण्यात येत आहे. या योजनेत मुलींच्या भविष्यकाळासाठी अधिक तरतूद करण्यात येते. योजनेत डिसेंबर २००३नंतर जन्म झालेल्या मुलींसाठी आई-वडील किंवा कायदेशीर पालक मुलीच्या नावाने खाते उघडू शकतात. कमीत कमी एक हजार रुपयांची गुंतवणूक करून हे खाते सुरू करता येते. त्यात आर्थिक वर्ष एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत कमीतकमी एक हजार जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. खाते उडल्यानंतर १४ वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येईल. प्रत्येक आर्थिक वर्षात कमीत कमी एक हजार रुपये भरणे आवश्यक आहे. एखाद्या आर्थिक वर्षात रक्कम भरल्यास ५० रुपये दंड आकारण्यात येतो. विभागात या योजनेची १५ हजार खाती आहेत. 

जास्तीत जास्त गुंतवणुकीला संधी 
सुकन्यायोजनेतून मुलींसाठी जास्तीत जास्त गुंतवणूक करता येते. मुलगी १० वर्षांची झाल्यानंतर स्वत:चे खाते चालवू शकते. परंतु पालकांनी रकमेचा भरणा करावयाचा आहे. या योजनेत सहभागी मुलीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास पालकांना भरलेली रक्कम व्याजासह परत मिळेल. 

५० टक्के रक्कम काढता येते 
२१वर्षे पूर्ण झाल्यावर या योजनेत गुंतवलेली पूर्ण रक्कम व्याजासह मिळेल. मात्र, १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण किंवा मुलीच्या लग्नासाठी जमा रकमेतून ५० टक्के रक्कम काढता येते. दरम्यान, खाते २१ वर्षे मुदतीचे असले तरी १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलीचे लग्न ठरल्यास ते सुरू ठेवता येत नाही. 

- पालकांनी केलेल्यागुंतवणुकीवर ९.२ टक्के व्याजदर मिळणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेला भुसावळ टपाल विभागात चांगला प्रतिसाद आहे. मार्च महिन्यात हा प्रतिसाद पुन्हा वाढेल. आम्हीदेखील जनजागृती करतच आहोत.
डी.एस. पाटील, डाक अधीक्षक, टपाल विभाग, भुसावळ 
बातम्या आणखी आहेत...