आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहमार्ग अप्पर पाेलिस अधीक्षक कार्यालयाचा नव्याने दिला प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नागपूर लाेहमार्ग पाेलिसांचे कार्यक्षेत्र माेठे असल्यामुळे भुसावळात अप्पर पाेलिस अधीक्षक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, गेल्याच महिन्यात अप्पर पाेलिस अधीक्षक कार्यालयाचा प्रस्ताव नव्याने पाेलिस महासंचालक कार्यालयासह गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात अाला अाहे. नवीन वर्षात प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती लाेहमार्ग पाेलिस विभागाचे अधीक्षक शैलेंद्र बलकवडे यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बाेलताना दिली.
 
नागपूर लाेहमार्ग पाेलिस अधीक्षकांचे कार्यक्षेत्र नागपूरपासून इगतपुरी, नंदुरबार, अाैरंगाबाद, परभणीपर्यंत विस्तारले अाहे. त्यामुळे जवळपास अर्ध्या राज्यातील पाेलिस ठाण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जीअारपी पाेलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले अाहे. कार्यक्षेत्राची विभागवणी व्हावी म्हणून भुसावळात लाेहमार्ग पाेलिसांचे अप्पर पाेलिस अधीक्षक कार्यालय असावे, असा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात शासनाकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्याने अाता पाेलिस अधीक्षक कार्यालयाने नव्याने प्रस्ताव दिला आहे. सुधारीत प्रस्ताव पाेलिस महासंचालकांना दिला आहे. तेथून हा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला जाणार अाहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर भुसावळात अप्पर पाेलिस अधीक्षक कार्यालय स्थापन केले जाणार आहे. भुसावळ आणि जळगाव हे महत्त्वपूर्ण रेल्वे स्थानके असल्याने परिसरात दुर्दैवाने गुन्हेगारीचा आलेख वाढता आहे. त्यामुळे भुसावळात अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय असणे अत्यंत आवश्यक आहे.
 
- जळगावातनवे जीआरपी ठाणे : जळगावरेल्वे स्थानक भुसावळ लाेहमार्ग पाेलिस ठाण्याच्या अंतर्गत येते. भुसावळ जीआरपीची हद्द जळगावपर्यंत अाहे. त्यामुळे भविष्यात जळगाव स्थानक परिसरातच लोहमार्ग पोलिस ठाण्याची उभारणी होणार आहे. 

नवे जीआरपी ठाणे 
जळगाव रेल्वे स्थानकावरील गुन्हेगारी वाढली आहे. सुरत मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील गैरप्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जळगावात नवीन लाेहमार्ग पाेलिस ठाणे निर्माण करण्याचा प्रस्ताव लाेहमार्ग पाेलिस अधीक्षक बलकवडे यांनी पाेलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठवला अाहे. जळगावात नव्याने जीआरपी पाेलिस ठाणे निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा प्रस्ताव गृह विभागाकडे जाणार असून, तेथूनच हिरवा कंदील मिळणार अाहे, असे अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. 

- प्रस्ताव पाठवला: भुसावळ-जळगाव दरम्यान तिसरी रेल्वे लाइन टाकली जात आहे. त्यामुळे सुरतकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्याही वाढत अाहे. त्याच पार्श्वभूमीवर भुसावळात अप्पर पाेलिस अधीक्षक कार्यालय निर्मिती करण्याचा प्रस्ताव पाठवला अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...