आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरेश जैन म्हणाले, जेलमधील साडेचार वर्षांनी शिकवले स्वातंत्र्याचे महत्त्व!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- साडेचार वर्षे कारागृहात असताना स्वातंत्र्य काय असते, त्याचे महत्त्व किती अाहे ते मी अनुभवले. स्वातंत्र्य नसेल तर किती बंधने असतात, हे मी अनुभवले. साडेचार वर्षांनंतर मी कर्मभूमीत पुन्हा परत अालाे अाहे. या साडेचार वर्षांत अनेक अनुभव अाले, असे मत माजी अामदार घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन यांनी माध्यमांशी बाेलताना व्यक्त केले.

सर्वाेच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर जैन शनिवारी जळगावात अाले. साडेचार वर्षांनी त्यांनी प्रथमच त्यांच्या शिवाजीनगर या निवासस्थानी पाऊल ठेवले. या वेळी माध्यमांशी बाेलताना त्यांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर जळगावात अाल्याचा विशेष अानंद असल्याच्या भावना व्यक्त केल्या. कारागृहामध्ये स्वातंत्र्याचे माेल कळाले, काेणलाही कारागृहाचा अनुभव येऊ नये, अशी माझी भावना अाहे.

सामाजिक, राजकीय अायुुष्यात अनेक लाेकांची कामे केल्याने लाेकांचे अाजही प्रेम कायम अाहे. ते यापुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. राजकारणाबाबत निश्चित विचार नसला तरी समाजकारण हा पिंड असल्याने अाणि सेवा हा स्थायी भाव असल्याने समाजकारणात सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या महिनाभर तरी विश्रांती घेऊन नंतर पुढचा निर्णय घेणार असल्याचे जैन या वेळी म्हणाले.

राजकारणाचा विचार नाही
राजकारणीही प्रमुख अाेळख असली तरी सध्या सक्रियतेबद्दल विचार केलेला नाही. सध्या केवळ खटल्यावर लक्ष केंद्रित करू, घरीच थांबून विश्रांती घेण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...