आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेपीनाथ मुंडेंचे जनसंघापासूनचे सहकारी, खडसेंचे मार्गदर्शक सूर्यभान अण्णा वयाने थकले; लढाऊ बाणा अजूनही कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल - दिवंगतभाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे जनसंघापासूनचे सहकारी, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राजकीय वाटचालीतील मार्गदर्शक सूर्यभान हिरामण पाटील यांच्यामुळे साकळी (ता.यावल) या गावाचा केवळ भाजपच नव्हे, तर इतर पक्षांमध्ये दबदबा आहे. अण्णा या नावाने परिचित सूर्यभान पाटील यांनी वयाची ५० पेक्षा जास्त वर्षे पक्षवाढीसाठी खर्ची घातली. १९६२मध्ये ग्रामपंचायत, त्यानंतर १२ वर्षे पंचायत समिती १९९२ ते ९७दरम्यान जिल्हा परिषदेत त्यांनी कामाचा ठसा उमटवला. 
 
भाजपचा आता जिल्ह्यात वटवृक्ष झालेला असला तरी जनसंघ असताना पूर्वी बोटावर मोजण्याएवढे कार्यकर्ते होते. त्यात साकळीच्या सूर्यभानअण्णांचे नाव वरच्या फळीत होते. अण्णांनी १९६२मध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकीय श्रीगणेशा केला. यानंतर सलग १२ वर्षे पंचायत समिती आणि १९९२मध्ये जिल्हा परिषदेत विजय मिळवला. या वेळी बांधकाम समितीत समावेश झाल्यावर बोकाळलेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी त्यांनी घेत भ्रष्टाचार निर्मुलन समिती स्थापन केली. आता वयोमर्यादेमुळे ते सक्रिय राजकारणातून अलिप्त असले तरी रवींद्र पाटील हे त्यांचे पुत्र नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाले. 
 
अशी आहे दीनचर्या : वयाच्या८३व्या वर्षातही अण्णा दररोज पहाटे वाजता उठतात. अंघोळीनंतर देव पूजा, वृत्तपत्र वाचन, फावल्यावेळी नातवंडांमध्ये रमणे, माध्यमिक विद्यालयास भेट, ग्रामस्थांच्या सुख-दु:खात सहभागी होणे अशी अण्णांची दिनचर्या आहे. 

मुंडे म्हणाले होते अण्णा कुठेय? 
गोपीनाथ मुंडे सन १९८२मध्ये जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या वेळी जिल्हाभरातील नेते पदाधिकारी त्यांच्या भेटीसाठी गेले. या प्रचंड गर्दीमध्येही मुंडेंनी साकळीचे सूर्यभानअण्णा कुठे आहेत? अशी विचारणा केली. या वेळी अनेकांना अण्णा आणि मुंडे जनसंघापासूनचे ‘सोबती’ असल्याचे ज्ञात झाले हाेते. 

ते सध्या काय करतात ? 
बातम्या आणखी आहेत...