आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव, जामनेरातील पाच तलाठी निलंबित, महसूल उत्पन्नाचे उद्दिष्ट अपूर्ण राहिल्याने कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महसूल उत्पन्नातील वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करू शकलेल्या ७/१२ संगणकीकरण उताऱ्यांमधील घोळास कारणीभूत ठरलेल्या जळगाव तालुक्यातील जामनेरातील तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी जि.प. शाहू सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी ही कारवाई केली आहे. प्रांताधिकारी अभिजित भांडेपाटील यांनी या संबंधीचे मंगळवारी सायंकाळी पत्र काढले.
कॅशलेस माझं गाव विविध शासकीय योजनांबाबत मंगळवारी जळगाव जामनेर तालुक्यातील ग्रामसेवक, कृषीसेवक, विस्तार अधिकारी यांच्यासह महसुलाबाबत तलाठी यांची बैठक बोलावण्यात आली होती. या वेळी महसूल यंत्रणेतील कर्मचाऱ्यांबाबतसंताप व्यक्त केला. समाधानकारक महसुली उत्पन्न करू शकलेल्या जळगाव तालुक्यातील एस.जी.चत्रे (सुजदे), व्ही.एन.संदानशिवे (फुपणी), एस.आर.नेरकर (पिंप्राळा) यांच्यासह जामनेर तालुक्यातील श्री. गवते (टाकरखेडा), एस.एच.पठाण (बेटावद) या तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. यासह या वेळी बैठकीला गैरहजर राहिलेल्या तलाठ्यांना नोटिसा देण्यात येणार आहेत. दरम्यान, समाधानकारक उत्तरे देऊ शकलेल्या काही तलाठ्यांना बैठकीतून बाहेर काढण्याची कारवाईही या वेळी महसूल कर्मचाऱ्यांवर झाली. बैठकीत एकाच वेळी झालेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
बातम्या आणखी आहेत...