आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: तलवारहल्लाप्रकरणी सात जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
भुसावळ - किरकोळ कारणावरून यावल राेडवरील राहुलनगरमध्ये शनिवारी तलवारहल्ला झाला होता. यात चार जण जखमी झाले अाहेत. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात शनिवारी रात्री सात जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात अाला. 
 
यावल राेडवरील राहुलनगर येथून शुक्रवारी डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीतील महिलांच्या मागे भरत सुभाष इंगळे याने फटाके फाेडले. त्याला याेगीता गाढे यांनी विरोध केला. त्याचा वचपा काढण्यासाठी शनिवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास भरत इंगळे, सागर सुभाष इंगळे, सुभाष संभाजी इंगळे, प्रमाेद नरवाडे, रतन इंगळे, प्रितम कैलास इंगळे, विशाल उत्तम इंगळे यांनी तलवार, चाकू, लाकडी दांड्याने सागर गाढे, सतीश उर्फ छाेटू ढाकणे, शंकर उत्तरम रंधे, अरूण रंधे यांना मारहाण केली. या घटनेत चौघे जखमी झाले अाहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू अाहे. सागर गाढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पाेलिस ठाण्यात दंगलीसह अाॅर्म अॅक्ट कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास दत्तात्रय चाैधरी करीत अाहेत. 
 
खबरदारी म्हणून गस्त सुरू 
राहुलनगर भागात शनिवारी झालेल्या घटनेमुळे परिसरातील दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरातील स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांनी गस्त सुरू केली आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...