आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामनेर: दुर्गम यादीत टाकली 42 गावे; शिक्षक बदल्यांसाठी खटाटाेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - शिक्षकांच्याबदल्या डोळ्यासमोर ठेऊन दुर्गम गावांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्यमार्गावरील गावांसह दळणवळणाची अनेक साधने उपलब्ध असताना ४२ गावांत नैसर्गिक अडथळे असून दळणवळण नाही, असा शेरा यासाठी मारण्यात आला आहे. दुर्गम गावांच्या यादीत रांजणी, मेणगाव, चिंचखेडा, गाेद्री अादि गावांचा समावेश अाहे. 
 
शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेत शासनाने बदल केला आहे. यासाठी मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र, मार्गदर्शक सूचना बाजूला ठेऊन आर्थिक स्वार्थासाठी काही मर्जीतील शिक्षकांना केंद्रप्रमुखांना हाताशी घेऊन दुर्गम गावांची यादी तयार करण्यात आली आहे. जामनेर तालुक्यातील तब्बल ४२ गावांचा या दुर्गम यादीत समावेश करण्यात आला आहे. यावल चोपडा ही दोन तालुके आदिवासी बहुल तालुके असूनही या तालुक्यांमध्ये क्रमश: १९ ११ गावांचा दुर्गम भागात समावेश करण्यात आला आहे. तुलनेत जामनेर तालुक्यात प्रत्येक गावात रस्ते दळणवळणाची साधने असतानाही केवळ आर्थिक स्वार्थासाठी अशा गावांचा दुर्गम भागात समावेश करण्याचे पातक जामनेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केले आहे. याबाबत तालुक्यातील शिक्षकांत असंतोष असून अनेकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांपासून तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत लिखित स्वरुपात तक्रारी केल्या आहेत. मात्र, अशा तक्रारींना केराची टोपली दाखवून ४२ गावांचा समावेश असलेली दुर्गम गावांची यादी फायनल करण्यात आली आहे. दरम्यान, ही यादी चारवेळा बदलण्यात आली असल्याची कुजबुज अाहे. याबाबत गटशिक्षणािधकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते सुटीवर निघून गेले असून त्यांनी भ्रमणध्वनीसुद्धा बंद करून ठेवला असल्याने वारंवार प्रयत्न करूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, येत्या अाठवडाभरात हा विषय तापण्याची शक्यता अाहे. करमाळच्या मुख्याध्यापकांनी तर थेट लढा देण्याची तयारी केली अाहे. 
 
लढा देण्याची तयारी काय आहे दुर्गम यादी 
तालुकामुख्यालयापासून लांब अंतरावर आहेत. ज्या गावांमध्ये दळणवळणाचे साधन नाही. नैसर्गिक अडथळा आहे. शिक्षक जाण्यास इच्छुक नाहीत. शिक्षकांची सतत रिक्त रहाणारी पदे, डोंगराळ दुर्गम भाग, असे काही निकष दाखवून दुर्गम भागाची यादी तयार करण्यात आली आहे. यादीत समावेश असलेली काही गावे राज्यमार्गावर तर प्रत्येक गावात एसटी महामंडळाची बससेवा आहे किंवा दळणवळणाची भरपूर साधने उपलब्ध आहेत, अशाही गावांचा दुर्गम यादीत समावेश करण्यात आला आहे. 
 
- शासनाच्या निकषानुसारदुर्गम यादीत बसत असल्याने शिक्षणाधिकाऱ्यांच्या यादीत करमाळचा समावेश करण्यात आला होता. मात्र, गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या स्तरावरून फेरबदल करून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत करमाळचा समावेश नाही. न्याय मिळण्यासाठी न्यायालयातही जाऊ. -भरत चौधरी, मुख्याध्यापक, करमाळ.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...