आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ: फुलेनगरात युवकावर तलवारीने केला वार, दाेन संशयितांना घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - मामाजी टाॅकीज राेडवरील महात्मा फुलेनगरात शनिवारी दुपारी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात युवकावर तलवारीने वार झाल्याची घटना घडली. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
घराबाहेरील रस्त्यावर टाकलेल्या खाटेमुळे दुचाकी जाण्यास अडथळा निर्माण झाल्यामुळे सुनील जाेनवाल, अनिल ऊखा सोनवणे आणि समाधान सोनवणे यांच्यात वाद झाला. वादातून दिलीप रामलाल जोनवाल, बंटी दिलीप जाेनवाल आणि सुनील जाेनवाल यांनी अनिल साेनवणे यांना मारहाण केली. तसेच तिघांनी सोनवणे यांच्यावर तलवारीने आणि विटेने वार केला. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने अनिल सोनवणे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी साेनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप, सुनील बंटी जाेनवाल यांच्याविरूध्द शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. याप्रकरणी पाेलिसांनी दिलीप सुनील यांना ताब्यात घेतले अाहे. या प्रकारामुळे भिती निर्माण झाली आहे. 
 
सायंकाळी हाणामारी 
महात्मा फुलेनगरात शनिवारी दुपारी तलवारहल्ल्याची घटना घडल्यानंतर याच भागातील संताेष शंकर पाटील या युवकाला परिसरातील तीन ते चार युवकांनी सायंकाळी फायटरने मारहाण केली.रक्तबंबाळ अवस्थेत पाटीलने शहर पोलिस ठाणे गाठून या घटनेची तसेच संशयितांची माहिती दिली. पोलिसांनी त्याला रुग्णालयात रवाना केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...