आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृताची पटली ओळख मृत इसम शिरपूर तालुक्यातील वाघाडीचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल तालुक्यातील कासारखेडा शिवारातील एका विहिरीत २१ डिसेंबरला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह अाढळून आला होता. या मृताच्या कपड्यांवरून त्याची ओळख पटवण्यात यावल पोलिसांना मंगळवारी (दि.१९) यश आले. मृताची पत्नी भावाने मृताची ओळख पटवली. मृताचा घातपात झाल्याचा संशय असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे.
यावल- कासारखेडाशिवारातील पोलिस पाटील प्रवीण पाटील यांच्या शेतातील विहिरीत २१ डिसेंबरला अंदाजे ४० वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला होता. याच वयोगटातील इसम वाघाडी (ता.शिरपूर) येथून बेपत्ता असल्याचे पोलिस तपासात समोर आले. म्हणून यावल पोलिसांनी शिरपूर पोलिसांसोबत संपर्क साधून बेपत्ता व्यक्तीच्या कुटुंबीयांना मंगळवारी यावल पोलिस ठाण्यात बोलावले. सहायक निरीक्षक जगदीश परदेशी यांनी मृताचे कपडे दाखवताच ओळख पटली. मृत इसम सतीलाल बाबुलाल पाटील (वय ४१, रा. वाघाडी, ता. शिरपूर) असल्याचे समोर आले. मृताच्या पत्नी मीनाबाई पाटील, भाऊ विश्वास पाटील, वेडू पाटील यांनी मृताची ओळख पटवली. मृत पाटील १८ डिसेंबरपासून वाघाडी येथून बेपत्ता होते. गावातीलच बबलू उर्फ संतोष राजाराम वाणी या संशयिताने त्यांचे अपहरण करून घातपात केल्याचा संशय पाटील यांच्या कुटुंबीयांना आहे. त्यामुळे शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Áदुचाकीवर प्रवास : मृतपाटील दुचाकीवर गावातून निघाले होते. वाणी याने त्यांना धानोरा (ता. चोपडा)पर्यंत आणले. त्यापुढे पाटील यांचा प्रवास कसा झाला, तसेच नायगावच्या व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध अशा अनेक प्रश्नांचा उलगडा बाकी आहे. या प्रकरणाचा तपास यावल पोलिस करतात किंवा शिरपूर पोलिस करतात याबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही.
असा आहे घटनाक्रम : १८डिसेंबरला मृत पाटील सकाळी १०.३० वाजता घराबाहेर पडले. मात्र, दोन दिवसांनंतरही ते घरी परतल्याने पाटील यांच्या पत्नीने शिरपूर पोलिसात हरवल्याची खबर दिली. बेपत्ता इसम आणि मृतदेहाचे वर्णन िमळते जुळते असल्याने पोलिसांनी नातेवाइकांना मृताचे कपडे दाखवले.
कॉल डिटेल्सची केली तपासणी
शिरपूरचे पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी गुन्ह्याचा तपास करताना सतीलाल पाटील यांच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासले. पाटील बेपत्ता झाले त्याचदिवशी संशयित वाणी याचे नायगाव (ता.यावल) येथील व्यक्तीसोबत अनेकदा बोलणे झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच पाटील यांच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन आडगाव (ता. यावल) येथील मिळाले. याच आधारे यावल पोलिस मृतदेहापर्यंत पोहोचू शकले. आता या घटनेची पार्श्वभूमी पोलिस तपासात उलगडणार आहे.
मृताचे कपडे नातेवाइकांना दाखवताना यावल पोलिस.
मृत सतीलाल पाटील