आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राचा निर्णय, गॅसजोडणीची तपासणी करा अन्यथा घरगुती सिलिंडर देण्याचा भरला दम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गॅसगळतीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी गॅस जोडणीची तपासणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी गॅस कंपन्या एजन्सी चालकांवर सोपवली आहे. या तपासणीसाठी १५० रुपये आकारले जात असल्याने बहुतांश ग्राहक गॅस जोडणीच्या तपासणीस टाळाटाळ करीत आहेत. मात्र, ३१ डिसेंबर अखेरपर्यंत तपासणीचे उद्दिष्ट दिल्याने सुरक्षिततेसाठी गॅसधारकांची जोडणी बंद करण्याचा इशारा एजन्सी चालकांनी दिला आहे.
घरगुती स्वयंपाकाचा गॅस वापराबाबत सुरक्षितता पाळली जावी, यासाठी वर्षातून एकदा गॅस जोडणीची तपासणी करणे आवश्यक आहे. पण, तपासणीसाठी १५० रुपये आकारले जात असल्याने एजन्सी चालकांचे उद्दिष्ट पूर्ण होण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. यातच ही आकडेवारी ३१ डिसेंबर अखेर पूर्ण करणे आवश्यक असल्याने एजन्सी चालकांवर दबाव वाढत आहे. तपासणीची संख्या वाढवण्यासाठी थेट गॅस जोडणी बंद करण्याचा इशारा एजन्सी चालकांनी दिला आहे.

-ग्राहकांसाठी हीतपासणी फायदेशीरच आहे. अपघाताची घटना ही सांगून येत नाही. यासह तपासणी अहवाल नसल्याने विम्याचे फायदेही ग्राहकांना मिळणार नाहीत. ग्राहकांनी ही तपासणी केल्यास त्यांचे कनेक्शन ब्लॉक करण्याचा अधिकार एजन्सी चालकांना आहे. ग्राहकांनी स्वत: यासाठी पुढाकार घ्यावा.
- दिलीपचौबे, गॅस एजन्सी चालक

तपासणी फायदेशीरच
उपकरण चेकिंग चार्ज

उपकरण चेकिंग चार्ज’च्या नावाखाली ग्राहकांकडून तपासणी फी आकारली जात आहे. केवळ गॅस सिलिंडरला पाहून, रेग्युलेटर वर-खाली करून तपासणी पूर्ण झाल्याचे सांगत ग्राहकांकडून पैसे घेतले जातात. एजन्सीकडून होणारी ही तपासणी खराेखरच सुरक्षेसाठी आहे की रक्कम उकळण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. या सक्तीच्या वसुलीमुळे ग्राहकांमधून नाराजी व्यक्त केली आहे.

तक्रारींसाठीयेथे साधा संपर्क
वितरकांविषयीच्या तक्रारी संबंधित गॅस कंपन्यांचे विक्री अधिकारी, विभागीय अधिकारी आणि ग्राहक तक्रार निवारण केंद्र. तसेच जिल्हा नागरी पुरवठा अधिकाऱ्यांकडेही करता येते. यासह कंपन्यांच्या संकेतस्थळावर तपशीलवार तक्रार करण्याची सुविधा आहे.

{ याविषयी साशंकता असल्यास पोलिस अथवा एजन्सी चालकांकडे तक्रार करा.
गॅस सुस्थितीत का? तो योग्यरीत्या ठेवला आहे की नाही, रेग्युलेटर, गॅस पाइप, शेगडीचे बर्नर, चालू-बंद स्वीच यांच्यासह अनेक बाबी तपासणीत समाविष्ट केल्या आहेत. गॅस कंपन्यांच्या म्हणण्यानुसार दर दोन वर्षांनी ही मोहीम राबवली जाते. या वर्षी मात्र या दरात दुपटीने वाढ झाल्याचे ग्राहक सांगतात. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने ही तपासणी योग्य आहे. पण, त्यासाठी १५० रुपये देणे बंधनकारक आहे. गॅस कंपन्याही ग्राहकांना आमचा मेकॅनिक गॅस तपासणीसाठी येणार असून त्याला सहकार्य करा, १५० रुपये शुल्कही द्या, असे संदेश ग्राहकांना पाठवत आहेत. मात्र, ही रक्कम जास्त असल्याने ग्राहक आणि कंपनीचे मेकॅनिकांमध्ये वादही होत आहेत. त्यामुळे अपेक्षित तपासणीची संख्या पूर्ण होत नाही. मुदतीत तपासण्या झाल्या नाही तर कारवाईची शक्यता एजन्सी चालकांकडून व्यक्त केली जात असल्याने आता त्यांच्यापुढेही जोडण्यांची तपासणीचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यांनी स्वत:च या तपासणीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

०१ लाख११ हजार शहरातील ग्राहक संख्या
यापैकी आज अखेर सुमारे ४० हजार कनेक्शनची तपासणी पूर्ण झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...