आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यविक्रीचे परवाने सरकारजमा करून व्यसनमुक्तीचा संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमळनेर- मद्यविक्रीचे पाच परवाने बिनशर्त सरकारजमा करून अमळनेरच्या डाॅ. ऊर्मिला अग्रवाल यांनी व्यसनमुक्तीचा संदेश दिला अाहे. अमळनेरच्या रहिवासी असलेल्या डाॅ. अग्रवाल यांचे वास्तव्य सध्या पुण्यात अाहे. सन १९७८मध्ये त्या दहावी उत्तीर्ण झाल्या. पुढे पाच वर्षांनी अर्थात १८८३ मध्ये त्या पुुरुषाेत्तम अग्रवाल यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांच्याकडे तेव्हा देशी दारूचे चार, विदेशी दारू विक्रीचा एक असे पाच परवाने हाेते. कुटुंबात भरपूर पैसा हाेता; पण स्वास्थ्य नव्हते. त्यातच पतीचा तीन वेळा अपघात झाला. पैसा असूनही सुख-शांती नव्हती. मुले लहान हाेती. त्यातूनच नैराश्याने तणाव वाढत गेला. त्यानंतर त्यांना पुण्यात माहेरी अाईकडे उपचारासाठी जावे लागले. मानसिकदृष्ट्या त्या सक्षम नसल्याने सन १९९८ मध्ये त्यांना येरवडा येथील मनाेरुग्णालयात जावे लागले. तेथे त्यांचा संपर्क वेगवेगळ्या विषयाने ग्रासलेल्या १ हजार ८०० महिलांशी अाला. मनाेरुग्णावस्थेतून बाहेर येऊनही काही महिलांना त्यांचे नातेवाईक घरी घेऊन जात नसल्याचे निदर्शनास अाल्याने त्या अधिक व्यथित झाल्या. तेथूनच त्यांनी उपेक्षित महिलांसाठी काही तरी नवे काम करून दाखवण्याचा ध्यास घेतला. 

मद्यविक्रीच्या व्यवसायामुळे अापले स्वास्थ्य खराब झाल्याचा विचार त्यांच्या मनात सातत्याने घाेळत हाेता. पुन्हा तणावाने अापल्याला घेरू नये म्हणून त्यांनी उपचार घेऊन घरी परतल्यावर महिलांवर एक पुस्तक लिहिण्याचा संकल्प केला. शिक्षण दहावीपर्यंतच असल्याने भाषा, शब्दांची अडचण येईल म्हणून त्यांनी स्वत: लेखिका हाेण्यासाठी पुन्हा सन १९९८ मध्ये लग्नाच्या दाेन दशकांनंतर अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला. पुढे हिंदी विषयात कला शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान, एरंडाेल येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले पती पुरुषाेत्तम अग्रवाल यांना उपनगराध्यक्षपदाची संधी मिळाली. तेव्हा त्यांच्याकडे देशी दारूचे चार व विदेशी दारू विक्रीचा एक परवाना हाेता. हे सर्व परवाने डाॅ. ऊर्मिला अग्रवाल यांनी त्यांचे मतपरिवर्तन करून सन १९९८ ते २००३ या काळात बिनशर्त सरकारजमा केले.

उपेक्षितांसाठी संभव स्कूल : हल्लाबाेल’ या एकपात्री नाटिकेतून त्या स्त्री भ्रूणहत्या राेखण्याचा संदेश देतात. या नाटिकेचे त्यांनी सन २००७मध्ये जळगाव जिल्ह्यात ५१ तर संपूर्ण भारतात २२२ प्रयाेग नि:शुल्क सादर केले अाहेत. सन २००४मध्ये तत्कालीन उपराष्ट्रपती भैराेसिंह शेखावत यांच्या हस्ते त्यांना या कार्याबद्दल सन्मानित करण्यात अाले अाहे. पुण्यात त्यांनी ‘क्रिशिव प्रेम फाउंडेशन’ स्थापन केले असून या माध्यमातून ‘संभव स्कूल’ सुरू केले अाहे. अनाथ, गाेरगरीब मुलांसाठी या शाळेत माेफत शिक्षणाची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली अाहे.

वाङ््मय वाचनाची गाेडी... : हिंदी साहित्य वाचनाची गाेडी लागल्याने त्यांनी हिंदी विषयात ‘नारी जीवन के विविध अायाम’ हा विषय पीएचडीसाठी निवडला. शरद जाेशी, रवींद्रनाथ त्यागी यांच्या लेखनावर संशाेधन करून डाॅ. शैलजा माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनात शाेधप्रबंध तयार करून लग्नाच्या दाेन दशकानंतर अर्थात सन २०१४ मध्ये उमवितर्फे पीएच.डी. मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांना यासाठी डाॅ. सुरेश माहेश्वरी, अाई दर्शनादेवी अग्रवाल, सासरे उमरावसिंग अग्रवाल, सासू कस्तुराबाई अग्रवाल, पती पुरुषाेत्तम अग्रवाल यांची साथ लाभली. मुलगा क्षितीज व अाकाश यांनीही प्राेत्साहन दिले.
बातम्या आणखी आहेत...