आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: ‘समांतर’साठी आजपासून अतिक्रमण हटाव; विक्रेत्यांची आवराआवर सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शासकीय आयटीआयजवळ रविवारी दुपारपासून हॉकर्सनी स्वत: अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला. - Divya Marathi
शासकीय आयटीआयजवळ रविवारी दुपारपासून हॉकर्सनी स्वत: अतिक्रमण काढून रस्ता मोकळा केला.
जळगाव - महामार्गावरील अपघात समांतर रस्त्यावरील अतिक्रमणासंदर्भात सर्वच पातळीवर वातावरण तापलेले अाहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने खड्डे साइडपट्टी दुरुस्तीपूर्वी सोमवार, दि. २७ आणि २८ फेब्रुवारी राेजी अतिक्रमण हटाव माेहीम राबवण्यात येणार अाहे. महापालिकेचे मनुष्यबळ पाेलिसांचा बंदाेबस्तात ही कारवाई केली जाणार अाहे. खोटेनगरपासून ही माेहीम राबवली जाणार अाहे. दरम्यान, प्राधिकरणाच्या आदेशानुसार कारवाईच्या एक दिवस अाधीच समांतर रस्त्यावरील विक्रेत्यांनी दुकाने अावरण्यास सुरुवात केली अाहे. 
 
शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर सातत्याने अपघातांचे प्रमाण वाढले अाहे. महामार्गावरील खड्डे महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यांची असलेली दुर्दशा हेच अपघातांना प्रमुख कारण असल्याचा निष्कर्ष काढण्यात अाला अाहे. प्रशासनाने समांतर रस्ते तयार केल्यास नागरिकांना महामार्ग टाळून प्रवास करणे साेपे ठरणार अाहे. त्यामुळे अपघातांचाही धाेका टळणार अाहे. डिसेंबर महिन्यात ‘दिव्य मराठीने समांतर रस्ते, शहरातून जाणाऱ्या महामार्गासाठी केलेला ड्राइव्ह आणि त्या अंतर्गत घेतलेली स्वाक्षरी मोहीम यामुळेच यश मिळाल्याचे समजले जात अाहे. या स्वाक्षरी मोहिमेत शहरातील जवळपास हजारांपेक्षा अिधक नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. 
 
त्यानंतर गेल्या दाेन महिन्यांत शहरातील सामाजिक संघटनांनी अावाज उठवत वेगवेगळ्या अांदाेलनांच्या माध्यमातून हा विषय उचलून धरला हाेता. शहरातील दाेन्ही अामदारांनीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन समांतर रस्त्यांच्या कामासाठी अाग्रही भूमिका मांडली हाेती. महामार्ग साइडपट्टीच्या कामासाठी १० काेटींचा निधी मंजूर झाला अाहे. त्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महानगरपालिका पाेलिस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण काढण्याची तयारी दाखवली अाहे. 
 
गेल्या अाठवड्यात ‘नही’चे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी महानगरपालिका अायुक्त जीवन साेनवणेंची भेट घेऊन चर्चा केली हाेती. तसेच शनिवारी पाेलिस अधिकाऱ्यांसाेबत समांतर रस्त्यावरील अतिक्रमणाची पाहणी देखील करण्यात अाली अाहे. रविवारी सायंकाळी ‘नही’चे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी पाेलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानुसार साेमवार मंगळवारी समांतर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार अाहे. 
 
अनेकांनी काढून घेतले अतिक्रमण 
समांतर रस्त्याच्या दाेन्ही बाजूने कापड वेगवेगळ्या वस्तू विक्रीची दुकाने वर्षानुवर्षे सुरू अाहेत. अधिकाऱ्यांनी शनिवारी पाहणी केल्यानंतर या विक्रेत्यांना सूचना देखील केली अाहे. त्यामुळे साेमवारी अचानक कारवाईचा सामना करण्यापूर्वी अायटीअायजवळील बऱ्याच विक्रेत्यांनी दुकाने हलवण्यास सुरुवात केली अाहे. कारवाईच्या दरम्यान नासधूस हाेण्याची भीती लक्षात घेता, ही काळजी घेण्यात अाल्याचे सांगण्यात अाले. 
 
असा आहे तगडा पोलिस बंदोबस्त 
संध्याकाळी अतिक्रमण विभागाचे एच.एम. खान, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांची पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक झाली. या वेळी अतिक्रमण काढण्यासाठी ७० पोलिस कर्मचारी, सहा अधिकारी, एक राखीव पोलिस दलाची तुकडी, एआरटीची तुकडी तैनात करण्यात येणार आहे. 
 
४० मनपा कर्मचारी दिमतीला 
खोटेनगरपासून दाेन्ही बाजूंच्या समांतर रस्त्यांवरील अतिक्रमण कारवाई सुरू केली जाणार अाहे. सकाळी वाजता माेहिमेस सुरुवात केली जाणार अाहे. यासाठी पालिकेचे पथक सकाळी वाजता हजर राहणार अाहे. यात अतिक्रमणचे ४० कर्मचारी, ट्रॅक्टर त्यावर प्रत्येकी कर्मचारी असे अतिरिक्त १५ कर्मचारी, ट्रक जेसीबी तैनात ठेवले जाणार अाहे. 

खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पर्यायी जागा 
१०महिन्यांपूर्वी बहिणाबाई उद्यान सागर पार्क येथील हाॅकर्सला स्थलांतरीत करण्यात अाले हाेते. पर्यायी जागांची निवड करताना महापालिकेने थेट समांतर रस्त्याच्या जागेत व्यवसाय करण्यास परवानगी दिली हाेती. परंतु, अाता समांतर रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याने प्रभात चाैक अायटीअायजवळील हाॅकर्सला पुन्हा पर्यायी जागेवर स्थलांतरीत करण्यात येणार अाहे. यासंदर्भात महासभेत ठराव करून जागेचा निर्णय हाेत नाही ताेपर्यंत याेग्य जागेचा शाेध घेऊन व्यवसाय करू दिला जाणार अाहे. पुढच्या अाठवड्यात यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता अाहे. 
 
बातम्या आणखी आहेत...