आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेर झाले शिरजाेर: लिफ्ट देऊन मध्यरात्री चाेरट्यांनी हिसकावली डॉक्टरची साेन्याची चेन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोरट्यांनी गळ्यातील साेन्याच्या चेनला जाेरात हिसका देऊन ओढल्यामुळे डॉ. त्रिपाठी यांच्या गळ्याला झालेली दुखापत. - Divya Marathi
चोरट्यांनी गळ्यातील साेन्याच्या चेनला जाेरात हिसका देऊन ओढल्यामुळे डॉ. त्रिपाठी यांच्या गळ्याला झालेली दुखापत.
जळगाव - शहरात साेनसाखळी चाेरट्यांची दहशत वाढली अाहे. मंगळवारी रात्री वाजता लिफ्ट देऊन मणियार लाॅ काॅलेजच्या मैदानावर तीन चाेरट्यांनी एका दंतराेगतज्ज्ञांशी झटापट करून त्यांच्या गळ्यातील तीन ताेळे वजनाची ७५ हजार रुपये किमतीची साेन्याची चेन हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात जबरी चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
महाबळ परिसरातील देवेंद्रनगरातील दंतराेगतज्ज्ञ डाॅ. श्रीधर चंद्रशेखर त्रिपाठी (वय २४) हे मंगळवारी १२.३० वाजता त्यांच्या नातेवाइकांना साेडण्यासाठी रेल्वेस्थानकावर अाले हाेते. नेहरू चाैकात त्यांच्या दुचाकीचे पेट्राेल संपल्याने त्यांनी दुचाकी महापालिकेच्या इमारतीसमाेरील एका दुकानाच्या बाजूला लावली. त्यानंतर ते रेल्वे स्थानकात गेले. नातेवाइकांना साेडल्यानंतर ते घराकडे जाण्यासाठी रिक्षा शाेधत हाेते. मात्र, रात्रीची वेळ असल्याने रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे सांगत हाेते. त्यामुळे डाॅक्टर काेणत्याही रिक्षात बसले नाही. रात्री १२.४५ वाजता एक काळ्या रंगाच्या दुचाकीवर अालेल्या तरुणाने डाॅ. त्रिपाठी यांना कुठे जायचे, याविषयी विचारणा केली. त्यांनी देवेंद्रनगर सांगितल्यानंतर मी शिव काॅलनीला चाललाे असल्याचे सांगून डाॅक्टरांना दुचाकीवर बसण्यास सांगितले. तसेच ताे त्याचे नाव तुषार पाटील असे सांगत हाेता. त्या तरुणाने बसस्थानकाजवळ सिगारेट पिण्यासाठी दुचाकी थांबवली. सिगारेट पित असताना त्या तरुणाला माेबाइलवर एक फाेन अाला. त्याने ‘अाई मी येताेय’ रस्त्यातच असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या तरुणाने दुचाकी नूतन मराठा महाविद्यालयाच्या मागच्या गल्लीतून टाकली. त्या वेळी डाॅ. त्रिपाठी यांनी त्याला स्वातंत्र्य चाैकाकडून दुचाकी घेऊन जाण्यास सांगितली. मात्र, त्याने एेकले नाही. बाहेती महाविद्यालयाकडून मणियार लाॅ काॅलेजच्या मैदानावर त्याने मधाेमध दुचाकी थांबवली. डाॅ. त्रिपाठी यांना शंका अाली. त्यांनी त्याला विचारले असता, त्याने एक सिगारेट पिऊन पुढे जाऊ, असे सांगून माचिस मागितली. मात्र, माचिस नसल्याने त्याने दुचाकीच्या लाइटमध्ये मैदानात माचिस शाेधण्याचा बनाव केला. काही वेळानंतर बाहेती महाविद्यालयाकडून दाेन तरुण त्या ठिकाणी अाले. त्यापैकी एक डाॅ. त्रिपाठी यांच्याजवळ अाला. तर दुसरा त्या तरुणाजवळ जाऊन गप्पा मारत हाेता. डाॅ. त्रिपाठी यांना त्याने विचारपूस केल्यानंतर त्यांच्याशी झटापट करण्यास सुरुवात केली. हाणामारी केल्यानंतर त्याने डाॅ. त्रिपाठी यांच्या गळ्यातील साेन्याच्या चेनला जाेरात हिसका दिला. मात्र, एका प्रयत्नात चेन तुटल्याने त्याने दाेन, तीन वेळा हिसकली. त्यात डाॅ. त्रिपाठी यांच्या गळ्याला जखमाही झाल्या. त्यांनी अारडा अाेरड केली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने काेणीही मदतीला अाले नाही. त्यानंतर एक दुचाकीस्वार महामार्गाच्या दिशेने निघून गेला. तर दाेघा चाेरट्यांनी जिल्हा उद्याेग केंद्राकडून पाेबारा केला. डाॅ. त्रिपाठी यांनी बऱ्याच अंतरापर्यंत चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चाेरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. घाबरलेल्या अवस्थेत त्रिपाठी मोठी हिंमत करून आयएमआर महाविद्यालय परिसरात राहणाऱ्या एका मित्राच्या रूमकडे गेले. 
 
हद्दीच्या वादामुळे फिरफिर  
डाॅ. त्रिपाठी यांनी अायएमअार महाविद्यालयाजवळ राहत असलेल्या त्यांच्या मित्राच्या खाेलीवर जाऊन हा प्रकार सांगितला. त्यांनी रात्री वाजेच्या सुमारास रामानंदनगर पाेलिस ठाणे गाठले. त्या ठिकाणी त्यांची तक्रार घेतली. मात्र, घटनास्थळ जिल्हापेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे सांगितले. त्यानंतर दाेघांनी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात जाऊन दिलेल्या तक्रारीवरून जबरी चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 
 
पोलिसांचे गस्ती पथक गायब 
1 ) चोरट्यांनी महिला आणि वृद्धांना टार्गेट करून सोनसाखळी लांबवण्याचा फंडा अवलंबला होता. त्यानंतर आता नागरिकांनाही लुटण्यास सुरुवात केली आहे. या सोनसाखळी चोरीतील चोरटे हे अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. त्यातील अनेक चोरटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे डॉक्टराला लुटल्याने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. 

2 ) शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या रस्त्यावर नेहमी ख्वाजामियाँ चौक, पुढे गणेश काॅलनी आणि बजरंग बोगद्याजवळ मध्यरात्री पोलिसांचे पथक गस्तीवर असते. मात्र, मंगळवारी रात्री या तिन्ही ठिकाणी एकही पथक गस्तीवर नव्हते. त्यामुळेच चोरट्यांचे चांगलेच फावले. या घटनेमुळे आतातरी पोलिसांनी परिसरात नियमित गस्त घालावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...