आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 भामट्यांची करामत : पैसे पडल्याचे खुणावून बँकेच्या कॅश काउंटरवरील कोर्टाचे 93 हजार लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टेट बँकेच्या कॅश काउंटरवर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यास बोट लावून खुणावताना चोरटा. - Divya Marathi
स्टेट बँकेच्या कॅश काउंटरवर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यास बोट लावून खुणावताना चोरटा.
जळगाव - जिल्हा न्यायालयातील विविध चलनांचा स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत भरणा करण्यासाठी आलेल्या न्यायालयाच्या एका कर्मचाऱ्यास पैसे खाली पडल्याचे हाताने खुणावून भामट्यांनी काउंटरवर ठेवलेली ९३ हजारांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी ११.३० वाजता घडली. 
 
कोर्टातील बेलीफ रामचंद्र सीताराम घाेडके शरद सुकदेव पाचपोळ हे दोघे मंगळवारी दुपारी ११.३० वाजता चलनांचा भरणा करण्यासाठी स्टेट बँकेत गेले होते. ते क्रमांकाच्या काउंटरवर उभे होते. त्यांनी भरण्याचे ९३ हजार १३० रुपये चलनात गुंडाळून ठेवले होते. याचवेळी घाेडके यांच्या शेजारी एक भामटा आला. त्याने ‘तुमचे पैसे खाली पडले आहेत,’ असे घोडकेंना सांगितले. त्यांच्या पायाजवळ १० रुपयांच्या चार नोटा पडलेल्या होत्या. भरण्यातील पैसे खाली पडल्याचा संशयामुळे त्यांनी नोटा उचलल्या. तर दोन सेकंदांतच दुसऱ्या भामट्याने काउंटर खिडकीजवळ ठेवलेली पैशांची गड्डी उचलून पळ काढला. हा प्रकार घोडके पाचपोळ यांच्या लक्षात आले. त्यांनी अारडाओरड करून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. यानंतर दोघांनी बँक मॅनेजरला भेटून घडलेला प्रकार सांगितला. दुपारी वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 
 
गर्दीतून सुरक्षारक्षकाला धक्का देत पलायन 
स्टेट बँकेत सकाळी ११ वाजेपासून ग्राहकांची प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते. अशी वर्दळीची वेळ निवडत भामट्यांनी कोर्टाच्या कर्मचाऱ्यांकडील पैसे पळवले. बँकेच्या आत शिरण्यासाठी एक लोखंडी चॅनल गेट आणि त्यानंतर काचेचा दरवाजा, अशी व्यवस्था आहे. चॅनल गेटजवळ बंदुकधारी सुरक्षारक्षक तैनात असतो. तर काचेच्या आतमध्ये ग्राहकांची गर्दी असते. भामटे या दोन्ही गेटमधून चलाखीने पळून गेले. दरम्यान, बाहेर पडत असताना त्यांनी काही ग्राहकांना आणि सुरक्षारक्षकाला धक्का दिला. 
 
असे आहे भामट्यांचे वर्णन 
पैसे लांबवणाऱ्या भामट्यांपैकी एकाने बदामी रंगाचा हाफ शर्ट निळ्या रंगाची जिन्स घातली होती. तर दुसऱ्या भामट्याने आकाशी रंगाचा शर्ट काळ्या रंगाची पॅण्ट घातली होती. दोघी भामटे शरीराने मजबूत होते. 
 
पोलिसांनी घेतले फुटेज 
घटना घडल्यानंतर बँक प्रशासनाने जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक गजानन राठोड यांच्यासह पथक दाखल झाले. पोलिसांनी बँकेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यानुसार भामट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, चालक माेबाइलवर गुंग; कारमधून लांबवली बॅग...