आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: घराचे कुलूप कापून 85 हजारांचा एेवज लंपास; चाेरीसाठी लहानग्यांचा वापर केल्याचा संशय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपाटाची तपासणी करताना ठसे तज्ज्ञ. - Divya Marathi
कपाटाची तपासणी करताना ठसे तज्ज्ञ.
जळगाव - महाबळपरिसरातील माेहननगरातील वृंदावन गार्डनजवळील बंद घराचे कुलूप कटरने कापून चाेरट्यांनी राेख ४२ हजार रुपयांसह ८५ हजारांचा एेवज लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ठसे तज्ज्ञांना कपाट इतर वस्तूंवर एका ते वर्ष वयाेगटातील मुलांच्या बाेटांचे ठसे अाढळले. त्यामुळे या चाेरीत लहान मुलांचा वापर केल्याचा संशय पाेलिसांनी व्यक्त केला अाहे. 
 
माेहननगरातील वृंदावन गार्डनजवळ प्लाॅट क्रमांक ८८, चंद्रकांत हिंमतराव वाघ (वय ४५) हे राहतात. वाघ यांच्या पत्नी ऊर्मिला वाघ या दाेन दिवसांपूर्वीच मुलांना घेऊन बहिणीच्या मुलाचा साखरपुडा असल्याने शिरपूर येथे गेल्या हाेत्या. तर चंद्रकांत वाघ रविवारी सकाळी महानगरी एक्स्प्रेसने नाशिक त्यानंतर सिन्नर येथे साखरपुड्यासाठी गेले हाेते. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावलेले हाेते. साेमवारी सकाळी ११.३० वाजता वाघ यांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुलकर्णी यांनी फाेन करून दरवाजाचे कुलूप तुटलेले असून दाेन्ही दरवाजे उघडे असल्याचे सांगितले. त्यानंतर वाघ यांनी त्यांच्या नातेवाइकांना घरी पाठवून रामानंदनगर पाेलिसांना घटनेविषयी माहिती दिली. नातेवाइकांनी घरी जाऊन बघितले त्या वेळी दाेन्ही दरवाजे उघडे हाेते. बेडरूममधील लाेखंडी कपाटाचे दरवाजे उघडे हाेते. कपाटाच्या लाॅकरमधील ४२ हजार रुपये राेख, ४३ हजारांचे साेन्या, चांदीचे दागिने, असा एकूण ८५ हजारांचा एेवज चाेरट्यांनी लंपास करून
कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले हाेते. 
 
किरकाेळ वस्तूंचीही चाेरी 
चाेरट्यांनी वाघ यांच्या घरातील कपाटात मुलांसाठी ठेवलेले शाॅर्पनर, खाेडरबर, पेन्सिल, माेबाइलचे मेमरी कार्ड, चांदीचे नाणे पूजेसाठी ठेवलेल्या नाेटाही लंपास केल्या अाहेत. तसेच मागच्या दरवाजाला लावलेले लाेखंडी कुलूपही चाेरट्यांनी ताेडले अाहे. 
 
दागिने साेबत नेल्याने वाचले... 
साखरपुड्यासाठी घरातील साेन्याचे दागिने वाघ कुटुंबीयांनी साेबत नेले हाेते. त्यामुळे ते वाचले. तर घरात काही व्यवहारातील पैसे ठेवले हाेते. ते चाेरट्यांनी लंपास केले. 
 
कपाट इतर वस्तूंवर लहान मुलांच्या बाेटांचे ठसे 
चाेरीची घटना घडल्यानंतर रामानंदनगर पाेलिसांनी ठसे तज्ज्ञांना बाेलावले हाेते. त्या वेळी त्या तज्ज्ञांना कपाट इतर वस्तूंवर एका ते वर्ष वयाेगटातील मुलांच्या बाेटांचे ठसे अाढळले. वाघ हे साेमवारी दुपारी वाजता परत अाल्यानंतर पाेलिसांनी त्यांना या वयाेगटातील मुलगा घरात अाहे काय? असे विचारले असता त्यांच्या घरात एवढा लहान मुलगा नसल्याचे सांगितले. त्यामुळे पाेलिसांना या चाेरीत लहान मुलाचा वापर केल्याचा संशय अाहे. त्याच प्रमाणे वाघ यांच्या घराच्या गेटजवळ एक लहान मुलाची हिरव्या रंगाची स्लिपरही सापडली अाहे. त्यामुळे पाेलिसांना संशय अाणखीन पक्का झाला अाहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...