आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात चाेरट्यांच्या टाेळीचा धुमाकूळ; तीन ठिकाणी चाेऱ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात गुरुवारी मध्यरात्री चाेरट्यांच्या टाेळीने धुमाकूळ घातला. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शाहूनगर परिसरातील कच्छी चाळ, शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट अाणि केसी पार्क या तीन ठिकाणी चाेरट्यांनी चाेरी करून एकूण ६० हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे तिन्ही ठिकाणी घरात कुटुंबीय झोपले असताना अगदी सावधपणेे चाेरट्यांनी हातसफाई केली. तिन्ही घटनेत चोरट्यांनी वापरलेली चाेरीची पद्धत एकसारखी असल्यामुळे एकाच टाेळीने या चोऱ्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 
उच्छाद वाढला | शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६० हजार ५० रुपयांचा ऐवज लंपास 
 
केसी पार्क परिसरात राहणाऱ्या एका युवकाच्या खिशातील साडेसहा हजार रुपयांची रोकडही गुरुवारी रात्री चोरीस गेली. या युवकाने गुरुवारी रात्री एटीएममधून साडेसहा हजार रुपये काढले होते. एटीएममधून पैसे काढल्याची स्लिप पैसे एकत्र गुंडाळून त्याने पॅन्टच्या खिशात ठेवले होते. रात्री झोपताना दरवाजाची कडी लावण्याचे तो विसरला. त्यानंतर सकाळी जाग आल्यावर दरवाजा उघडा होता. तसेच पॅन्टच्या खिशात ठेवलेले पैसे पावती गहाळ झाल्याचे आढळले. याप्रकरणी शहर पोलिसात नोंद केली आहे. 

शिवाजीनगरातील भुरे मामलेदार प्लॉट भागात राहणाऱ्या प्रमोद टेकचंद परदेशी यांच्याही घरात गुरुवारी रात्री चोरी झाली. परदेशी कुटुंबीय रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहून झोपले होते. पहाटे ४.३० वाजता परदेशींना जाग आली. त्यांनी उशीजवळ ठेवलेले दोघी मोबाइल पाहिले तर ते मिळून आले नाही. तसेच भिंतीवर टांगलेली पॅन्ट ही जागेवर नव्हती. पॅन्टच्या खिशातील साडेतीन हजार रुपये काढून पॅन्ट घराबाहेर फेकून दिल्याचे आढळून आले. चोरट्यांनी घरातून दोन मोबाइल साडेतीन हजार रुपये रोख असा एकूण हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश पाटील तपास करीत आहेत. 

शाहूनगर परिसरातील कच्छी चाळ जवळ राहणाऱ्या इब्राहिम सिकंदर तडवी (वय ४०) यांच्या घरातून ४० हजार रुपये रोख तीन मोबाइल असा एकूण ४४ हजार ५०० रुपयांचा ऐवज गेला आहे. तडवी हे गुरुवारी रात्री ११.३० वाजता कुटुंबीयांसह घरात झोपले होते. तर त्यांचा भाऊ युनूस बहिण हमीदा हे घराबाहेरील मोकळ्या जागेवर झाेपले होते. युनूस याने घराचा दरवाजा बाहेरून बंद केला होता. शुक्रवारी सकाळी वाजता त्यांच्या लहान भावाची पत्नी सलमाबी यांना जाग आल्यानंतर त्यांनी मोबाइल शोधला. मोबाइल मिळून आल्यामुळे त्यांनी कुटुंबीयांना झोपेतून उठवले. या वेळी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच कपाटही उघडे होते. कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली पर्स चोरट्यांनी लांबवली होती. या पर्समध्ये ४० हजार रुपये होते. तडवी कुटुंबीयांनी दुचाकी खरेदी करण्यासाठी हे पैसे गोळा केले होते. तसेच घरात ठेवलेले मोबाइल ही चोरट्यांनी लांबवल्याचे लक्षात आले. तडवी यांच्या घरातील काही कपडे चोरट्यांनी घराबाहेर नेऊन तपासले होते. हे कपडे घराबाहेरच फेकून दिले होते. तडवी यांच्या खिशातील अडीचशे रुपये कपाटातील ३०० रुपयांची चिल्लर चोरट्यांनी नेली नाही. तडवी कुटुंबीय घरात झोपलेले असताना चोरट्यांनी त्यांच्या अंगावरून सावकाशपणे उड्या घेत संपूर्ण घरात तपासणी केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक वासुदेव सोनवणे तपास करीत आहेत. 

चाेरीप्रकरणीशहर पोलिसांनी शाहूनगरातील तीन संशयितांना ताब्यात घेतले होते. या तिघांची दुपारी वाजेपर्यंत कसून चौकशी करण्यात आली. तिघांना विचारपूस केल्यानंतर देखील पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळालेली नव्हती.
 
बातम्या आणखी आहेत...