आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकिलाच्या घरातून चोरट्यांनी नववधूचे दागिने लांबवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या मुलाकडे सहकुटुंब पुण्याला गेलेल्या वकिलाच्या घरातून चोरट्यांनी सुनेचे सुमारे ५० हजारांचे दागिने लांबवण्याची घटना आदर्शनगरातील मकरा पार्कमध्ये घडली. शुक्रवारी दुपारी घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी फिर्याद घेण्यास नकार दिल्याचा आरोप वकिलांनी केला. 
मकरा पार्कमधील रहिवासी अॅड.अशोक पुंडलिक चौधरी यांचा मुलगा निखिल हा पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. त्याचे दोन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याचे संसार उपयोगी साहित्य घेऊन चौधरी कुटुंबीय जुलै रोजी पुणे येथे गेले होते. त्यांची सून स्नेहल यांचे दागिने महावस्त्र जळगाव येथील मकरा पार्कमधील घरीच होते. मुलगा सुनेला पुण्याला सोडून अॅड.चौधरी, त्यांची पत्नी आईसह जळगावला शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता परतले. त्यांना घराचा दरवाजा उघडा कुलूप तोडलेले दिसले. चोरट्यांनी कुलूप घरासमोरील कचरा कुंडीत टाकले होते. अॅड.चौधरी यांनी घरात प्रवेश केल्यावर समोरच्या मागच्या खोलीतील दोन्ही कपाट फोडले दिसले. त्यातील कपडे साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. कपाटातून सून स्नेहल यांची कर्णफुलांसह इतर दागिने चोरीला गेले आहेत. 

चोरट्यांनी लाइट, पंखे ठेवले सुरू 
चोरट्यांनी चोरी केल्यानंतर घरातील सर्व लाइट पंखे सुरू करून ठेवले होते. अॅड.चौधरी यांच्या वरच्या मजल्यावरील आव्हाणे येथील भाडेकरू नीलेश पाटील यांनी तीन दिवसांपू्र्वी घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहिले होते. त्यांना चोरी झाल्याची शंकाही आली होती. मात्र, कुणी नातेवाईक आले असतील, असा त्यांचा समज झाला. त्यांनी खात्री केली असती तर तीन दिवसांपूर्वीच घरफोडी उघड झाली असती. 
 
बातम्या आणखी आहेत...