आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरट्यांच्या हल्ल्यात महिला जागीच ठार, चाळीसगावातील घटनेत वृद्धालाही बेदम मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - चोरी करण्याच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोरट्यांचा प्रतिकार करत असताना डोक्यात टाॅमी टाकून महिलेचा खून करण्यात आला. तसेच तिच्या पतीला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना चाळीसगावातील आदर्शनगरात गुरुवारी रात्री वाजेच्या सुमारास घडली. 
 
शहरातील कमल सायकल मार्टचे संचालक दगडू कैलास देवरे (वय ६५) त्यांच्या पत्नी जिजाबाई दगडू देवरे( वय ५५) हे अादर्शनगरात राहतात. त्यांची तीन मुलेही त्यांच्या बाजूलाच राहतात. गुरुवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी काढली. 
 
मात्र, या वेळी घरात कुणीतरी प्रवेश करत असल्याचे जिजाबाई दगडू देवरे यांना जाणवले. या वेळी त्यांनी प्रतिकार केला असता, चाेरट्यांनी घरात प्रवेश करत जिजाबाई देवरे यांच्या डोक्यात टाॅमी (लाेखंडी राॅड) टाकली. यात त्या जागीच ठार झाल्या.
 
 या वेळी घरातील हा सर्व प्रकार पाहून दगडू दौलत देवरे हे जागे झाले असता चाेरट्यांनी त्यांनाही बेदम मारहाण केली. चोरट्यांनी या वेळी जिजाबाई देवरे यांच्या अंगावरील ३५ हजार रुपये किमतीची सोने, चांदीचे दागिनेही काढून नेले. 
 
चाेरट्यांचा मागोवा घेण्यासाठी घटनास्थळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले. पथकाने इच्छादेवी मंदिरापर्यंत माग दाखवला. घटनास्थळी पोलिस अधीक्षक जालिंदर सुपेकर, अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलिस उपअधीक्षक अरविंद पाटील, डीवायएसपी केशव पातोंड यांनी भेट देऊन माहिती घेतली. 
बातम्या आणखी आहेत...