Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» News About Threatening To Kill Ex-Councilor

जळगाव: माजी नगरसेवकाच्या कानशिलास गन लावून धमकी; हवेत गोळीबार

प्रतिनिधी | Mar 20, 2017, 08:18 AM IST

  • गन घेऊन फिरताना सिसीटीव्हीत कैद झालेला अजिज बाबा.
जळगाव -अजिंठा चौकातील भंगार बाजारात शनिवारी मध्यरात्री दाेन हिस्ट्रीशिटर गुंडांनी धुमाकूळ घातला. तसेच एका माजी नगरसेवकाच्या कानशिलास गावठी बनावटीचे पिस्तूल लावून ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलिसांनी रविवारी गेंदालाल मिलमधील दोघांना ताब्यात घेतले. त्यातील एकाच्या घरातून एक एअरगन ताब्यात घेतली आहे. घडलेल्या घटनेत अजिज बाबा याने पिस्तूलमधून गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे अाहे. मात्र, याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसून, घटनेतील माजी नगरसेवक इब्राहिम पटेल बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याशी संपर्क हाेऊ शकला नाही.
शिवाजीनगर परिसरातील गेंदालाल मिलमधील हिस्ट्रीशिटर गुंड अजिजखान बाबूखान पठाण मुलतानी ऊर्फ अजिज बाबा (वय ३३) अाणि त्याचा साथीदार डाॅन ऊर्फ संदीप मधुकर निकम (वय २०) यांनी शनिवारी रात्री अजिंठा चौकातील भंगार बाजारात गाेंधळ घातला. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास भंगार बाजारातील व्यावसायिक तथा माजी नगरसेवक इब्राहिम मुसा पटेल ऊर्फ इबा पटेल यांच्या दुकानावर येत दोघांनी दारूच्या नशेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच थांबता पटेल यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवत कानशिलावर पिस्तूल ठेवून ठार मारण्याची धमकी दिली. भंगार बाजारातील इतर तरुण कामगारांनी वेळीच मध्यस्थी करीत अजिज बाबाला बाजूला केले. त्यानंतर त्याने जाताना हवेत गोळीबार करून शिवीगाळ केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, याबाबत पोलिसांत कुठलीही तक्रार दाखल नसून, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून संशयितांचा शोध सुरू होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून शहर पाेलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह दीपक गंधाले, वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील, प्रीतम पाटील, दुष्यंत खैरनार, संजय शेलार, नवजित चौधरी, संजय भालेराव यांनी अजिज बाबा त्याचा साथीदार संदीप निकम या दोघांना एक एअरगनसह रविवारी ताब्यात घेतले आहे. मात्र, गुन्हा दाखल नसल्याने त्यांची चौकशी सुरू होती.
पुढील स्लाईडवर वाचा, शहरात गोळीबार झाल्याची चर्चा...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended