आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाेरट्यांनी दहा दिवसांत मारला 68 लाखांच्या सिगारेट‌‌्सवर डल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सिगारेट चोरट्यांनी १० दिवसांत जळगावसह खोपोली आणि पुणे येथेही सुमारे ६८ लाखांच्या सिगारेट्सवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे जळगाव येथे वापरलेली व्हॅन १९ तारखेला खाेपाेली अाणि २९ जानेवारीला पुणे येथे झालेल्या चाेरीतही वापरल्याचे समाेर अाले अाहे. 
 
चोपडा मार्केटमध्ये सुरेश पाटील यांच्या मालकीचे भारद्वाज एजन्सी, संतोष ट्रेडर्समध्ये चोरट्यांनी २६ जानेवारी राेजी ५२ लाख ९६ हजार रुपये किमतीचे ६७ सिगारेटचे बॅाक्स चाेरून नेले होते.
 
या चोरीत चाेरट्यांनी पिकअप व्हॅन (क्र. एमएच-१२-एलटी-७६४६) वापरली होती. ही व्हॅन चाेरीची असल्याचे उघड झाले अाहे. ही गाडी डिसेंबर महिन्यात पुण्यातून चाेरी झाली अाहे. यासंदर्भात पुणे शहरातील बंड गार्डन पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल अाहे. 
 
खाेपाेलीला चाेरी 
चोरट्यांनी२६ जानेवारीच्या जळगाव येथील चोरीत वापरेली पिकअप व्हॅन १९ जानेवारी राेजी खाेपाेली येथील चाेरीतही वापरल्याचे समाेर अाले अाहे. त्यांनी खाेपाेली येथील अशाेक पटेल यांच्या सिगारेटच्या गाेदामातून १५ लाखांच्या सिगारेट चाेरल्या.
 
तर चाेरट्यांनी त्यांचे सीसीटीव्हीचे डीव्हीअारही चाेरून नेले हाेते. तसेच गाेदामाच्या ड्राॅवरमध्ये कारची चावी सापडल्याने चाेरट्यांनी सिगारेटसह त्यांची १५ लाखांची नवी कार चाेरून नेली हाेती. 
 
याप्रकरणी खाेपाेली परिसरातील कालुपूर पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल केला अाहे. भजे गल्लीतील चाेरी उघड झाल्यानंतर त्यांनी कारच्या क्रमांकावरून शाेधाशाेध केली. तर खाेपाेली पाेलिसांना पुणे येथील तळेगाव टाेलनाक्यावर २० जानेवारी राेजी पहाटे ४.४३ वाजता जळगावच्या चाेरीत वापरलेली पिकअप व्हॅन अाणि एक संशयित लाल रंगाची कार दिसली. त्यामुळे दाेन्ही ठिकाणचे चाेरटे एकच असल्याचा पाेलिसांना संशय अाहे.
 
पुण्यातही चाेरी 
दाेनठिकाणी माेठा डल्ला मारल्यानंतर चाेरट्यांनी पुण्याकडे माेर्चा वळवला. भजेगल्लीत चाेरी झाल्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे २९ जानेवारी राेजी रात्री पुण्यातील चंदननगरात दाेन ठिकाणी अशाच पद्धतीने चाेऱ्या केल्या. त्यात एका गाेदामातून लाखांच्या तर दुसऱ्या गाेदामातून लाखांच्या सिगारेट लंपास केल्या अाहेत. याप्रकरणी पुणे पाेलिसात चाेरीचा गुन्हाही दाखल करण्यात अाला अाहे.