आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्ताईनगरात वाघाचा माग काढण्यासाठी ‘पगमार्क’चा शोध, सुरक्षेसाठी खबरदारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - बोदवड, भुसावळ आणि अर्ध्या मुक्ताईनगर तालुक्याचा समावेश असलेल्या मुक्ताईनगर वनक्षेत्रात पट्टेदार वाघांचे अस्तित्व आहे किंवा नाही? याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी आवश्यकता वाटल्यास ट्रॅप कॅमेऱ्यांचीदेखील मदत घेतली जाऊ शकते. सोमवारी पहाटे अंतुर्ली येथील वाडेकर कुटुंबीयांनी वाघ दिसल्याचा दावा केल्याने या प्रयत्नांना वेग देण्यात आला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात वढोदा आणि मुक्ताईनगर अशी दोन वनक्षेत्रे आहेत. या दोन्ही वनक्षेत्रांच्या मध्य भागातून पूर्णा नदी वाहते. परिणामी, आजूबाजूच्या दाट जंगलामुळे पट्टेदार वाघांच्या अधिवासासाठी नैसर्गिकदृष्ट्या सुरक्षित अधिवास तयार झाला आहे. तरीही प्रामुख्याने वढोदा वनक्षेत्रात वाघांचे वास्तव्य पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे. मात्र, मध्यंतरीच्या काही घटना पाहता मुक्ताईनगर वनक्षेत्रातही वाघांचे अस्तित्व आहे, अशी चर्चा समोर आली होती. आता १२ डिसेंबरच्या पहाटे अंतुर्ली येथील वाडेकर कुटुंबीयांना मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील रोपवाटिकेच्या परिसरात वाघ दिसल्याचे प्रकरण समोर आल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. असे असले तरी ही माहिती खरी की खोटी? यामधील सत्यता शोधून काढण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. वनक्षेत्रपाल पी.टी.वराडे यांच्याहस कर्मचाऱ्यांनी संबंधित भागात वाघाचे पगमार्क दिसतात का? याचा शोध सुरू केला आहे.

कुरण विकासामुळे तृणभक्षी प्राणी वाढले
वढोद्याच्या तुलनेत मुक्ताईनगर वनक्षेत्राचे क्षेत्रफळ सुमारे दोन हजार हेक्टरने जास्त आहे. या वनक्षेत्रात ते बिबटे असल्याचा वनविभागाचा दावा आहे. कुरण विकासाचे चांगले प्रयत्न झाल्याने हरीण, काळ‌वीट आदी तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली आहे. जंगलात वाढलेली सुरक्षितता आणि शिकारीसाठी उपलब्ध झालेले खाद्य पाहता वढोद्यातील वाघ मुक्ताईनगर वनक्षेत्रात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-मुक्ताईनगर वनक्षेत्रातबिबटे हमखास आहेत. या जंगलात पट्टेदार वाघांचा अधिवासदेखील असू शकतो. सोमवारी पहाटे मुक्ताईनगर-बोदवड रस्त्यावरील रोपवाटिकेजवळ वाघ दिसला. याची सत्यता पडताळण्यासाठी पगमार्क शोधत आहोत. पी.टी. वराडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुक्ताईनगर
बातम्या आणखी आहेत...