आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातव्या वेतन अायाेगातील त्रुट्या दूर करा, अन्यथा संप दोन हजार सदस्यांचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - फेब्रुवारी २०१४ मध्ये सातव्या वेतन अायाेगाचे गठण करण्यात अाले हाेते. मात्र, अाॅगस्ट २०१५ एेवजी नाेव्हेंबर २०१५मध्ये आयोगाचा अहवाल देण्यात आला.
‘एनएफअायअार’ने यासंदर्भात १९१ पानांचे निवेदन वेतन अायाेगाकडे दिले हाेते. या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची केंद्र शासनाने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा संप अटळ आहे, असा ठराव सीआरएमएसच्या वार्षिक अधिवेशनात सोमवारी सर्वानुमते पारित करण्यात आला.
सीअारएमएसच्या ४८व्या वार्षिक अधिवेशनाला कलामंदिरात सोमवारपासून सुरुवात झाली. अधिवेशनात मध्य रेल्वेच्या साेलापूर, पुणे, मुंबई, नागपूर भुसावळ या पाचही विभागातील सुमारे दाेन हजार कर्मचाऱ्यांरी पदाधिकारी त्यात सहभागी झाले आहेत. साेमवारी सकाळी कृष्णचंद्र सभागृहात एनएनअायअारचे महामंत्री डाॅ. एम. रघुवैय्या कार्यकारी अध्यक्ष तथा सीअारएमएसचे अध्यक्ष डाॅ. अार. पी. भटनागर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जनरल काऊन्सिलची बैठक झाली. बैठकीत २० विषयांवर चर्चा करण्यात आली. ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या अधिवेशनात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याची दिशा ठरवली जात आहे. तसेच या तीन दिवसीय अधिवेशानात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा हाेऊन ठराव पारित केले जात आहेत. रविवारी दुपारी अन्य विभागातील पदाधिकाऱ्यांचे भुसावळात अागमन झाले. प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांसाठी दोन स्वतंत्र डबे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मंगळवारीदेखील विविध विषयांवर चर्चा होणार आहे. अधिवेशनातील ठरावांबाबत केंद्र शासनाने गांभीर्य दाखवावे, असा सूर अधिवेशनात सोमवारी व्यक्त झाला.

अत्यंत चोख नियोजन
पाचही विभागातून अालेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी रॅली काढली. सीअारएमएसच्या विजयाच्या घाेषणा या वेळी देण्यात आल्या. सायंकाळी रेल्वे कला मंदिरात खुले अधिवेशन झाले. यात रेल्वे कर्मचाऱ्यांशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा करण्यात अाली. पाचही विभागातून अालेल्या कर्मचाऱ्यांच्या फराळाची भाेजनाची व्यवस्था कृष्णचंद्र सभागृहात करण्यात अाली हाेती.

अधिवेशनात मांडलेल्या मागण्या अशा
सातव्यावेतन अायाेगातील अन्यायकारक शिफारशी मागे घेऊन सरकारने जुलै २०१६ मध्ये दिलेले अाश्वासन पूर्ण करावे, नवी निवृत्ती वेतन याेजन रद्द करावी, चार्टर अाॅफ डिमांड्सला मंजुरी, प्रमाेशन तथा ग्रेड पे मध्ये सुधारणा, बाेनसची मर्यादा वाढवणे, एफडीअाय रद्द करणे, लार्जेस स्कीम, रिक्त जागांवर नियुक्त्या, शीघ्र ग्रेडच्या १५ टक्के सुपरवायझर यांना क्लास दाेनचा दर्जा, एमएसीपी स्कीम मधील त्रुटी दूर कराव्या, १० नाेव्हेबर १९८७पूर्वी रेल्वे सेवा भरतीतील कर्मचाऱ्यांना प्रथम श्रेणीचा पास, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना रेल्वेत नोकरी, रेल्वे हाॅस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भराव्यात, अाैषधाचा साठा मुबलक साठा, तास ड्यूटी, ठेकेदारी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांना नियमित करावे,असे ठराव पारित झाले.
बातम्या आणखी आहेत...