आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : आठवडाभर प्रबोधन; जनजागृतीनंतर महामार्गावर अाजपासून हेल्मेट सक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोलाणी मार्केटमधील एका दुकानावर हेल्मेट खरेदी करण्यासाठी वाहनधारकांची झालेली गर्दी. - Divya Marathi
गोलाणी मार्केटमधील एका दुकानावर हेल्मेट खरेदी करण्यासाठी वाहनधारकांची झालेली गर्दी.
जळगाव - जिल्हा पाेलिस प्रशासनातर्फे शुक्रवारपासून राष्ट्रीय अाणि राज्य महामार्गांवर हेल्मेट सीटबेल्ट सक्ती करण्यात अाली अाहे. यासाठी पाेलिस प्रशासन सज्ज झाले असून कारवाईसाठी १० विशेष पथकांची नेमणूक करण्यात अाली अाहे. हेल्मेट सीटबेल्ट वापरणाऱ्यांना जागेवरच हजार रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. दरम्यान, ही सक्ती करण्यापूर्वी पाेलिस दलाने अाठवडाभरापासून महामार्गावरील मुख्य चाैकांमध्ये वाहनचालकांचे ‘भाऊ, हेल्मेट घालत जा..., सीटबेल्ट लावून गाडी चालवा’ असे सांगून प्रबाेधन करण्यात अाले अाहे. तसेच शाळा, महाविद्यालय कंपन्यांना पत्र पाठवून संबधितांना सूचना देण्याचे कळविले अाहे. 
 
राष्ट्रीय राज्य महामार्गावर अातापर्यंत झालेल्या अपघातांपैकी सर्वाधिक अपघात हे दुचाकीस्वारांचे झाले आहेत. या अपघातांमध्ये डोक्याला मार लागल्यानेच अनेक दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला अाहे. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे शुक्रवारपासून महामार्गावर हेल्मेट अाणि सीटबेल्ट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. त्या अनुषंगाने पाेलिस प्रशासनाने संपूर्ण तयारी पूर्ण केली अाहे. 
 
या निर्णयाची अंमलबाजावणी करण्यापूर्वी पाेलिस प्रशासनाने शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी, शिक्षक, कर्मचाऱ्यांनी येताना जाताना हेल्मेट सीटबेल्ट सक्ती करण्याकामी ५० महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. तसेच एमअायडीसीतील कंपन्यांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना कंपनीत येताना जाताना दूर अंतरावरून यावे लागते. त्यांच्या सुरक्षेची सदर कंपनी, संचालक, मालकांची प्राथमिक जबाबदारी असून या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आवाहन करत सुमारे २५० कंपनीच्या मालक, संचालकांना देखील पत्र दिले आहे. एवढेच नव्हे तर महामार्गावर वाहनधारकांचे हेल्मेट वापरण्याबाबत प्रबाेधन देखील करण्यात अाले. 
शहर जिल्ह्यात पाेलिसांची १० पथके नियुक्त 
 
हेल्मेट खरेदीसाठी धावपळ 
हेल्मेट सक्तीच्या निर्णयामुळे गुरुवारी बाजारपेठेत हेल्मेट खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी दिसत हाेती. दुकानदारांनीही मागणीनुसार आपला स्टॉक करून ठेवला आहे. शहरात तीन ठिकाणी हेल्मेटचे वितरक, तर सुमारे ६० किरकाेळ विक्रीची दुकाने अाहेत. सध्या चांगल्या कंपनीचे हेल्मेट ८०० ते हजार रुपयांपर्यंत विक्री हाेत असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. 
 
संयुक्तपणे करणार कारवाई 
जिल्ह्यातील राष्ट्रीय राज्य महामार्गावर हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वार, सीटबेल्ट लावणाऱ्या कारचालकांवर जिल्हा पोलिस दल उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे शुक्रवारपासून कारवाई करण्यात येणार अाहे. ही कारवाई करताना वाहनधारकाला जागेवरच हजार रुपयांचा दंड केला
जाणार अाहे. 
 
वाहनधारकांचे प्रबोधन 
हेल्मेटची सक्ती करण्यापूर्वी पाेलिस प्रशासनातर्फे अाठवडाभर प्रबाेधन करण्यात अाले. वाहतूक पाेलिस चाैकाचाैकांत वाहने थांबवून वाहनधारकांना ‘भाऊ, हेल्मेट घालत जा...’, ‘अपघात झाल्यावर डाेक्यात हेल्मेट असेल तर अापले प्राण वाचू शकतात...’,‘सीटबेल्ट लावल्यामुळे अपघात झाल्यानंतरही अातापर्यंत अनेकांचे प्राण वाचले अाहेत...’, ‘सीटबेल्ट लावूनच गाडी चालवा...’असे सांगून प्रबाेधन करीत हाेते. 
 
काटेकाेर अंमलबजावणी व्हावी 
यापूर्वीहीपोलिस प्रशासनाने हेल्मेट सक्तीचा प्रयत्न केला होता. काही दिवस त्यावर अंमलबजावणी झाली. मात्र, नंतर परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. या वेळी तसे होऊ नये याबाबत पूर्णपणे काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. 
^जिल्ह्यात शुक्रवारपासूनहेल्मेट अाणि सीटबेल्टची सक्ती केली जाणार अाहे. त्यासाठी पाेलिस प्रशासनानेही जय्यत तयारी केली अाहे. हेल्मेट सीटबेल्टच्या कारवाईसाठी शहर वाहतूक शाखेचे अाणि जिल्हा वाहतूक शाखेचे अशी एकूण १० पथके नियुक्त करण्यात अाली अाहेत. डाॅ.जालिंदर सुपेकर, पाेलिस अधीक्षक 
 
बातम्या आणखी आहेत...