आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपनगर केंद्रात 1600 कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन, आज रास्ता रोको आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विविध प्रलंबित मागण्यांसाठी दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कंत्राटी कामगारांनी सोमवारी राज्यव्यापी आंदाेलनात सहभाग नोंदवला. - Divya Marathi
विविध प्रलंबित मागण्यांसाठी दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कंत्राटी कामगारांनी सोमवारी राज्यव्यापी आंदाेलनात सहभाग नोंदवला.
भुसावळ - महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांना ज्येष्ठतेप्रमाणे कायम नोकरीत समाविष्ट करुन घेण्यासह अन्य मागण्यांसाठी दीपनगरातील तब्बल १६०० कंत्राटी, आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी कामबंद आंदोलनात सोमवारी सहभाग घेतला. कंत्राटी कामगारांसह राष्ट्रीय मजदूर सेनेनेही या संपात सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी केले. 
 
महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांच्या काम बंद आंदोलनात दीपनगरातील कंत्राटी कामगार, राष्ट्रीय मजदूर सेना आदींसह कृती समितीने सहभाग नोंदवला. रविवारी रात्री १२ वाजेपासून कामगारांनी काम बंद आंदोलन केले. सोमवारी सकाळी निदर्शने करुन न्याय मागण्यांची पूर्तता होण्यासाठी मागणी करण्यात आली. कामगारांच्या या संपाला रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, राष्ट्रीय मजदूर सेनेचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, कृती समितीचे अरुण दामोदर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र चौधरी आदींनी भेट दिली. कृती समितीचे पदाधिकारी विक्रम चौधरी, दिलीप पाटील, समाधान पाटील, योगीराज सोनवणे, दीपक अडकमोल, विजय तावडे, गोविंदा डोळस, कैलास पाटील, सुनील राजपूत, कमलेश राणे, धनंजय चौधरी, सचिन भावसार, कैलास नेमाडे आदी उपस्थित होते. 
 
नेत्यांची कामगार सभा : कामगारनेते जगन सोनवणे आदींनी कामबंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शक्तीगड कार्यालयासमोर कामगार सभा घेतली. यावेळी महानिर्मितीने कामगारांना कायम करावे, वेतनवाढ, स्थानिक बेरोजगारांना संधी आदी मागण्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 
 
या आहेत प्रमुख मागण्या 
समानकाम आणि समान वेतन धोरण, कायम करेपर्यंत रोजंदारी कामगार पद्धत सुरू करा, रोजगाराची हमी द्या, ज्येष्ठता यादी तयार करा आदींसह परिपत्रकाचे पालन करणाऱ्या कंत्राटदारांवर कडक कारवाई करावी, या मागण्यांसाठी राज्यव्यापी संपात दीपनगरातील कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत. 
 
आज रास्ता रोको आंदोलन 
कामगारांच्या विविध मागण्यांप्रश्नी राष्ट्रीय मजदूर सेनेतर्फे मंगळवारी सकाळी वाजता सरगम गेटजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही कामगारांच्या मागण्यांची पूर्तता झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाणार असल्याचे प्रदेश महामंत्री जगन सोनवणे, अरुण दामोदर, हरिष सुरवाडे, भारतीय मजदूर संघाचे विक्रमी चौधरी आदींनी कळवले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...