आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पिंप्राळा बाजाराने वाहतुकीचा खाेळंबा, दुकाने अाणि नागरिकांची वाहने थेट साइटपट्टीपर्यंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्क, गुजराल पेट्राेल पंप ते खाेटेनगरपर्यंत भरत असलेल्या बुधवारच्या बाजारामुळे वाहतूक काेंडी हाेत अाहे. पाचपटीने वाढलेल्या बाजारातील विक्रेत्यांची दुकाने नागरिकांची वाहने थेट महामार्गाच्या साइटपट्टीपर्यंत येत असल्याने वाहतूक काेंडीमुळे दुर्घटना हाेण्याची भीती अाहे. सायंकाळी मानराज पार्क ते खाेटेनगर यादरम्यान महामार्गावर तब्बल पाऊण तासापेक्षा अधिक वेळ लागतो. तसेच या काळात अॅम्ब्युलन्सलही मार्ग मिळत नाही.
बाजारात रस्त्याच्या कडेला लागलेली दुकाने अाणि अात बाजारात जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिक महामार्गाच्या कडेलाच वाहने पार्किंग करतात. त्यामुळे दुपारी वाजेपासून रात्री वाजेपर्यंत वाहने महामार्गावरून पास हाेऊ शकत नाहीत. शिवाजीनगरचा पूल अवजड वाहतुकीसांठी बंद असल्याने बाहेरून वळवण्यात अालेली वाहने बाजारातच गुजराल पेट्राेलपंपापासून जुन्या महामार्गाकडे वळतात. बाजार असल्याने वाहतुकीच्या काेंडीत त्यामुळे भर पडत अाहे.

चाेर, पाकीटमारांचा त्रास
पथदिवे बंद असताना बाजारात गर्दी वाढत असल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी बाजारात चाेरा, पाकीटमार धुमाकूळ घालतात. aचाेरांचा त्रास असला तरी बाजाराच्या दिवशी पाेलिसांची गस्तदेखील नसते. बाजाराच्या दिवशी पूर्णवेळ पाेलिस वाढवण्याची मागणी परिसरातून हाेत अाहे.

राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद
मानराजते खाेटेनगर या भागातील महामार्गावरील पथदिवे बंद अाहेत. चार ते पाच ठिकाणी पाेल वाकलेले अाहेत. अनेक ठिकाणी लाइट फुटलेले अाहेत. यामुळे वाहनांच्या गर्दीत पायी चालणारे जीव मुठीत घेऊन चालतात. महापालिकेनेे दुर्लक्ष केले असून पावसाळ्यात चार महिने मागणी करूनही पथदिवे लागलेले नाहीत.

महासभेत प्रश्न मांडणार
^पिंप्राळा बाजाराच्या दिवशी मनपाने अतिक्रमण विभागाचे एक पथक पूर्णवेळ थांबवावे, ही मागणी येत्या महासभेत करणार अाहे. वाहतुकीची काेंडी, बाजारात येणाऱ्या नागरिकांचा त्रास हाेऊ नये, तसेच दुर्घटना हाेऊ नये म्हणून या पथकाने महामार्गावर दुकाने लावण्यात मज्जाव करावा. बाजाराच्या दिवशी पाेलिसाची गस्त वाढवावी, अशी मागणी पाेलिस अधीक्षक अाणि रामानंदनगर पाेलिसांकडे पत्र देऊन करणार अाहे. अमरजैन, नगरसेवक, पिंप्राळा.
बातम्या आणखी आहेत...