आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीटबेल्ट लावल्याने कारवाई; कारचालकाचा पाेलिसांशी वाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अाकाशवाणीचाैकात साेमवारी सकाळी ११.४५ वाजता इच्छादेवी चाैफुलीकडून येणाऱ्या कारचालकाने सीटबेल्ट लावलेला नसल्याने वाहतूक पाेलिस कर्मचाऱ्यांनी कार थांबवली. त्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या गाेष्टीचा राग येऊन चालकाने पाेलिसांशी वाद घालून अरेरावी केली. एवढेच नव्हे तर नगराध्यक्षाचा नातेवाईक असल्याचे सांगून त्याने पाेलिस कर्मचाऱ्यांवर दबाव अाणण्याचाही प्रयत्न केला. याच वादाची एक तरुण माेबाइलवर शूटिंग करीत हाेता. त्याला पाेलिसांनी हटकले असता त्याने देखील पाेलिसांशी हुज्जत घातली. या प्रकारामुळे बराच वेळ महामार्गावर वाहतुकीचा खाेळंबा झाला हाेता. 

धरणगाव येथील निसार अहमद पटेल हा साेमवारी सकाळी ११.४५ वाजता त्याची कार (क्रमांक एमएच- ०४, सीडी- ७२३६) घेऊन इच्छादेवी चाैफुलीकडून अाकाशवाणी चाैफुलीकडे येत हाेता. त्या वेळी अाकाशवाणी चाैफुलीवर कर्तव्यावर असलेले शहर वाहतूक शाखेचे पाेलिस कर्मचारी याेगेश पवार, विनाेद चाैधरी यांनी निसार पटेलची कार थांबवली. त्याने सीट बेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी २०० रुपये दंड भरण्यास सांगितले. त्यावरून याेगेश अाणि निसार यांच्यात वाद झाला. त्याने खाली उतरून पाेलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून अरेरावी करून त्यांच्या अंगावर धावून गेला. त्यानंतर त्याने नगराध्यक्षांचा नातेवाईक असून त्यांना फाेन लावून वाहतूक कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी बाेलण्यास सांगितले. त्या वेळी विनाेद चाैधरी यांनी नगराध्यक्षांशी बाेलून घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतरही निसारची अरेरावी सुरूच हाेती. गाडीत बसलेल्या काही महिलांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताे समजण्याच्या मनःस्थितीत नव्हता. 
बातम्या आणखी आहेत...